Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorized*माननीय मोदीजींचा 'विरासत ते विकास' संकल्प- ॲड. आशिष शेलार* ...

*माननीय मोदीजींचा ‘विरासत ते विकास’ संकल्प- ॲड. आशिष शेलार* सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सरकार कटिबद्ध- ना.चंद्रकांतदादा पाटील

 

 

पुणे: “पंडिता रोहिणीताई भाटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य कथ्थक साधनेसाठी अर्पण करून ही कला पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित केली. शास्त्रीय नृत्यातील कलाकार हे खऱ्या अर्थाने शिवाचे साधक असून आपली संस्कृती हीच आपली खरी ताकद आहे. संस्कृतीच्या संवर्धनासाठी माननीय नरेंद्र मोदीजींचा ‘विरासत ते विकास’ हा संकल्प आहे ,” अशी भावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.

 

पुण्यात आयोजित ‘पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवा’ला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताच्या दीडशेव्या वर्षानिमित्त कोथरुडमध्ये ७५० पेक्षा जास्त शास्त्रीय नृत्यांगना एकत्रितपणे कलाविष्कार सादर करून अनोखी मानवंदना दिली. या सोहळ्याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महापौर मंजुषा नागपुरे, प्रख्यात नृत्यगुरू शमा भाटे, मनीषा साठे आणि सुचेता चापेकर, महोत्सवाचे मुख्य संयोजक नगरसेवक पुनीत जोशी आणि अजय धोंगडे यांच्यासह नृत्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा महोत्सव आज एका उंचीवर पोहोचला आहे. मानवी उत्क्रांतीसोबतच आपण आपल्या सांस्कृतिक मुळांचा वारसा जपला, म्हणूनच आज जग भारताकडे ‘विश्वगुरू’ म्हणून पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

पुणे हे केवळ विद्येचे माहेरघर नसून कलाकारांची जननी देखील आहे, असे मत महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केले. “पंडिता रोहिणीताई भाटे यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या नक्षत्रांमुळे पुण्याचे नाव जगभरात पोहोचले आहे. पुणे महानगरपालिका शहराचा सांस्कृतिक वारसा जपत सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे,” असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

 

या महोत्सवामुळे पुण्यातील शास्त्रीय नृत्य क्षेत्राला मोठी ऊर्जा मिळाली असून, प्रस्तावित ‘नृत्यगृह’ हे आगामी काळात नृत्य साधकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, अशी भावना देशाच्या विविध भागातून आलेल्या नृत्यांगनांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments