Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील नामवंत संगीत संस्थांना ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांच्यातर्फे...

पुण्यातील नामवंत संगीत संस्थांना ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांच्यातर्फे देणगी प्रदान कार्यक्रम* पुणे भारत गायन समाज व गोपाळ गायन समाजाला प्रत्येकी ५ लाखांचा निधी

पुणे : संगीत व सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब विष्णू परांजपे व त्यांच्या पत्नी रमा परांजपे यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांचे वडील स्व. बापूसाहेब उर्फ वि. रा. परांजपे व आई कमलाबाई परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ते पुणे भारत गायन समाज व गोपाळ गायन समाज या दोन प्रतिष्ठित संस्थांना प्रत्येकी रुपये पाच लाखांची देणगी देणार आहेत.

हा देणगी प्रदान सोहळा मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता पेशवे हॉल, सारसबाग, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला श्री देवदेवेश्वर संस्थानचे अध्यक्ष रमेश भागवत तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच पुणे भारत गायन समाज संस्थेच्या शैला दातार, शिल्पा पुणतांबेकर, सावनी दातार या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच गोपाळ गायन समाजातर्फे विकास कशाळकर , राधिका जोगळेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी पुणेकरांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments