Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री काळ भैरवनाथ उत्सवानिमित्त कसब्यात बगाड गुरुवारी (दि.२)* श्री बहिरोबा देव ट्रस्ट,...

श्री काळ भैरवनाथ उत्सवानिमित्त कसब्यात बगाड गुरुवारी (दि.२)* श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन ; पालखी व बगाड

पुणे : श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांचा उत्सव गुरुवार, दिनांक २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. उत्सवांतर्गत लघुरुद्र, श्री भैरव अष्टोत्तर शतनामावली, आरती, पालखी व बगाड, महापूजा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

गुरुवारी सकाळी ६.३० वाजता लघुरुद्र व आरती, दुपारी १२ वाजता श्री भैरव अष्टोत्तर शतनामावली व माध्यान्ह आरती होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंदिर परिसरात भव्य पालखी सोहळा संपन्न होईल.

रात्री ९ वाजता मुख्य बगाड सोहळा होणार असून त्यानंतर रात्री ९.३० वाजता आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. त्यातीलच एक मुख्य उत्सव असलेला हा उत्सव अनेक वर्षे साजरा केला जातो.

कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित उत्सवाला व बगाडाकरिता भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments