Sunday, October 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedसारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना*  श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे...

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना*  श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’ ; धार्मिक विधींसह मान्यवरांची उपस्थिती

 

 

पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात पारंपरिक पद्धतीने बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे आणि सुप्रिया बडवे यांच्या हस्ते घटस्थापना झाली. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत.

 

घटस्थापनेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे.

 

उत्सवाच्या दहा दिवसांत अभिषेक, याग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५० हून अधिक सुरक्षारक्षक आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे विश्वस्त मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.

 

*भव्य सामूहिक श्रीसूक्त पठण सोहळा सोमवारी (दि.१२)*

सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता भव्य सामूहिक श्रीसूक्त पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीसूक्त हे ऋग्वेदातील श्री महालक्ष्मी देवीच्या स्तुतीस समर्पित पवित्र वैदिक स्तोत्र आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि कल्याण यांचे प्रतीक असलेल्या देवी महालक्ष्मीच्या उपासनेत श्रीसूक्त पठणाला विशेष महत्त्व आहे. सामूहिक पठणातून भक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि सामूहिक मंगलभावनेचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

या विशेष सोहळ्यास पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे शहरातील सर्व भाविक, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती आणि देवीभक्तांनी या मंगलमय सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन श्री महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments