शिकागो (एप्रिल १, २०२६) – हयात हॉटेल्स कॉर्पोरेशन ने आज विकास चावला यांची ‘अध्यक्ष – भारत व साऊथवेस्ट एशिया’ या नव्याने तयार करण्यात आलेल्या वरिष्ठ पदावर नियुक्ती जाहीर केली असून, याद्वारे भारतातील आपल्या व्यवसायाचा पुढील टप्पा सुरू केला आहे. १ एप्रिल २०२६ पासून होणारी ही नियुक्ती या क्षेत्रातील व्यवसायाचे नेतृत्व करेल. या नवीन नेतृत्व पदामधून हयातच्या धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बाजारपेठेमध्ये आपला विस्तार वेगाने वाढवण्यासाठी आणि ब्रँडची उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी असलेली कटिबद्धता दिसून येते.
ही नियुक्ती हयातसाठी भारतातील प्रबळ विकासाच्या गतीदरम्यान झाली आहे, जेथे कंपनी प्रमुख शहरी आणि पर्यटन स्थळांमध्ये आपला पोर्टफोलिओ व आगामी प्रकल्पांचा विस्तार करत आहे.
चावला हे हयातचे आशिया पॅसिफिकमधील ग्रुप प्रेसिडेंट डेव्हिड उडेल यांना रिपोर्ट करतील. “या नवीन वरिष्ठ नेतृत्व पदामधून भारतातील संधींची व्याप्ती आणि या बाजारपेठेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते,” असे उडेल म्हणाले. “चार दशकांहून अधिक काळ हयातने भारतात मजबूत पाया रचला आहे. आम्ही विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना विकास यांचा दांडगा अनुभव आणि उद्योजकीय नेतृत्व भारतातील आमच्या संस्थेच्या सर्वोच्च स्तरावर आवश्यक असलेले नवीन ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता घेऊन येईल. त्यांना भारतातील ग्राहकांबाबत असलेली सखोल समज या महत्त्वाच्या बाजारपेठेत आमच्या धोरणात्मक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल, तसेच आम्ही आमच्या ब्रँड-आधारित विस्ताराला गती देत आहोत आणि यशाचे नवीन मार्ग शोधत आहोत.”
फूड अँड बेव्हरेज आणि सल्लागार क्षेत्रातील ३० वर्षांहून अधिक जागतिक नेतृत्व अनुभव असलेले चावला भारत व साऊथवेस्ट एशियातील हयातची एकूण धोरणे, वाढ आणि कामगिरीचे नेतृत्व करतील. ब्रँड्सची निर्मिती करणे, व्यवसायाचा विस्तार करणे आणि धोरणात्मक वाढीला चालना देणे यामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे, जो हयातच्या माहितीवर आधारित आणि ब्रँड-केंद्रित संस्था होण्याच्या प्रवासाशी पूर्णपणे सुसंगत आहे. उच्च-क्षमता असलेल्या टीम्स विकसित करण्याप्रती त्यांची रुची आणि सातत्याने उद्योगात आघाडीची वाढ मिळवून देण्याचे त्यांचे कौशल्य भारतातील हयातच्या विकासाच्या पुढील टप्प्याला नवीन उंचीवर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
“भारतातील हयातच्या वाढीच्या प्रवासातील उत्साही व गतिशील वळणावर कंपनीत सामील होताना मला खूप आनंद होत आहे,” असे हयातचे भारत व साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष विकास चावला म्हणाले. “हयातचा मजबूत ब्रँड पोर्टफोलिओ, विशेष प्रतिभा आणि अतिथींना अर्थपूर्ण अनुभव देण्याप्रती कटिबद्धता यांमुळे येथे प्रचंड संधी उपलब्ध आहेत. माझा भारतातील सूक्ष्मदर्शी प्रवाशांमध्ये हयातला सर्वात पसंतीचा हॉस्पिटॅलिटी ब्रँड बनवण्याचा, तसेच रोजगारासाठी भारतातील सर्वोत्तम ब्रँड बनवण्याचा आणि हयातच्या जागतिक पोर्टफोलिओमध्ये वाढीचा महत्त्वपूर्ण स्तंभ म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा मनसुबा आहे.”
हयातसाठी भारत आशिया पॅसिफिकमध्ये सर्वात गतिशील विकास संधी देतो. प्रीमियम प्रवास, लक्झरी अनुभव आणि वैविध्यपूर्ण डायनिंग अनुभवासाठी वाढत्या मध्यमवर्गीयांची मागणी हयातच्या लक्झरी, लाइफस्टाइल, अनुभवात्मक सेवा आणि एफअँडबी क्षेत्रातील ताकदीशी सुसंगत आहे. यामुळे या प्रदेशात हयातच्या वाढीला मोठी चालना मिळाली आहे, तसेच २०२५ मध्ये झालेल्या करारांमुळे भारत आणि साऊथवेस्ट एशियातील प्रकल्पांमध्ये जवळपास ५,००० रूम्सची भर पडली आहे.
भारत आणि साऊथवेस्ट एशियातील नऊ ब्रँड्समधील ५५ हॉटेल्सच्या विद्यमान उपस्थितीचा विस्तार करताना आशिया पॅसिफिकमधील डेस्टिनेशन बाय हयात ब्रँडचे पहिले हॉटेल ‘हरी बाग जयपूर’ २०२६ मध्ये सुरू होणार आहे. ‘डेस्टिनेशन बाय हयात’ ब्रँड स्वतंत्र हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि रेसिडेन्सेसचा वैविध्यपूर्ण संग्रह आहे, जे मूळतः स्वतंत्र असले तरी प्रत्येक लोकेशनचा अस्सल उत्साहपूर्ण अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहे. ‘डेस्टिनेशन बाय हयात’ ब्रँडचे आगमन हा भारतातील हयातचा दुसरा कलेक्शन ब्रँड ठरेल, तर ‘हरी बाग जयपूर’ हे जयपूरमधील हयातचे तिसरे हॉटेल असेल.
अधिक पुढे जात हयातची मुंबई, बेंगळुरू, नवी दिल्ली आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आपली ब्रँड उपस्थिती अधिक दृढ करण्याची योजना आहे. तसेच, देशांतर्गत प्रवासाच्या वाढत्या मागणीमुळे भारत आणि साऊथवेस्ट एशियातील उच्च-विकासाच्या व अनुभवात्मक स्थळांवर विस्तार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये पर्यटन बाजारपेठा, आध्यात्मिक केंद्रे आणि निवडक द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांचा समावेश आहे.
या प्रसिद्धीपत्रकात सोयीसाठी ‘हयात’ हा शब्द ‘हयात हॉटेल्स कॉर्पोरेशन’ आणि/किंवा त्यांच्या एक किंवा अधिक संलग्न कंपन्यांचा उल्लेख करण्यासाठी वापरला गेला आहे.


