Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedभूमिगत करण्याबाबत चे धोरण ठरविणे गरजेचे. -संदीप खर्डेकर

भूमिगत करण्याबाबत चे धोरण ठरविणे गरजेचे. -संदीप खर्डेकर

पुणे – पुणे शहरातील केबलच्या अनधिकृत जाळ्यांवर महापालिकेने केलेली कारवाई अभिनंदनीय आहे पण त्याचवेळी या केबल भूमिगत करण्याबाबत धोरण ठरविण्याची गरज आहे असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी मनपा स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि आयुक्त नवल किशोर राम यांना एक पत्र सादर केले आहे त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की
केबल च्या अनधिकृत जाळ्यांवर कारवाई केल्याबद्दल अभिनंदन.तसेच
भूमिगत करण्याबाबत चे धोरण ठरविणे गरजेचे.आहे.

यापूर्वी मी अनेक वेळा हा विषय प्रशासनापुढे मांडला पण कधीच कारवाई झाली नाही.
ह्या अनधिकृत वायरच्या जाळ्यामुळे शहराची स्कायलाईन तर बिघडतेच पण त्याचबरोबर याद्वारे इंटरनेट अथवा केबल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या शहरात याचा मोफत वापर करून गडगंज संपत्ती कमवत आहेत.
मी यापूर्वीच प्रशासनाला निवेदन देऊन आकाशातील वाहिन्या भूमिगत करण्याची सक्ती करावी अशी मागणी केली आहे. मात्र याबाबत काही कंपन्याच्या प्रतिनिधिसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मांडलेली अडचण देखील महत्वाची आहे. यात रस्ते खोदाई चे शुल्क अव्वाच्या सव्वा असल्यामुळे आणि खोदाई ची परवानगी घेताना होणारा त्रास व प्रत्यक्ष खोदाई करताना तेथे कोणत्या न कोणत्या खंडणीखोरांचा होणारा त्रास व वसुली यामुळे देखील अनेक कंपन्या रीतसर काम करण्यास धजावत नाहीत.
तसेच एक नागरिक म्हणून मला असे वाटते की मनपा आकारत असलेले शुल्क हे खोदाई झाल्यावर रस्ते पूर्ववत करण्यासाठी आकारले जाते मात्र रस्ते पूर्ववत केले जात नाही. तरी त्याबाबत ही धोरण ठरविणे गरजेचे आहे.
सध्या संपूर्ण शहरात सी सी टी व्ही बसविण्यासाठी खोदकाम करण्यात आले,तसेच महावितरण च्या कामासाठी देखील खोदकाम सुरू आहेच ) त्याचवेळी येथे डक्ट तयार करण्यात आले असावे ( कार्यक्षम प्रशासनाने सर्वत्र डक्ट केले असेलच ) आकाशातील वाहिन्यांना भूमिगत करताना त्याचा वापर करावा व त्याचे भुईभाडे आकारावे म्हणजे नव्याने खोदकाम करावे लागणार नाही.
तरी आपण याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments