पुणे, १ एप्रिल २०२६: फोर्स मोटर्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या व्हॅन उत्पादक आणि आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये ३६,५३६ युनिट्सच्या एकूण देशांतर्गत घाऊक विक्रीची नोंद केली आहे, ज्यामध्ये गेल्या आर्थिक वर्ष २०२४–२५ मधील ३०,५३१ युनिट्सच्या तुलनेत २० टक्के वाढ केली आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रवासी वाहतूक विभागातील वाढती मागणी, तसेच संस्थात्मक आणि संरक्षण क्षेत्रामधील व्यवसायातील सातत्यपूर्ण दृढतेमुळे या वर्षात कंपनीच्या सर्व उत्पादनांमध्ये वाढ दिसून आली.
कंपनीचे प्रमुख उत्पादन असलेल्या फोर्स ट्रॅव्हलरने हलकी व्यावसायिक वाहने या श्रेणीमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मार्केट शेअरसह आपले नेतृत्व कायम ठेवले आहे. या यशामधून ग्राहकांचा दृढ विश्वास आणि शाळा व रुग्णवाहिका यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कंपनीची वाहने मोठ्या प्रमाणात वापरली जात असल्याचे दिसून येते.
या वर्षाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अर्बनियाची उत्तम कामगिरी, जेथे या वेईकलने विक्रीमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढीची नोंद केली, ज्यामुळे प्रीमियम प्रवासी गतीशीलता श्रेणीतील वेईकलचे स्थान अधिक पक्के झाले आहे. ताफा ऑपरेटर्स, कर्मचारी वाहतूक आणि संस्थात्मक खरेदीदारांकडून या उत्पादनाला वाढती पसंती मिळत आहे. तसेच, आरामदायी प्रवास, सुरक्षा आणि मालकीचा एकूण कमी खर्च या वैशिष्ट्यांमुळे ही वेईकल ग्राहकांसाठी पसंतीचा पर्याय म्हणून समोर येत आहे.
ट्रॅक्स प्लॅटफॉर्मने देखील उत्कृष्ट कामगिरी करत वर्षभरात आपल्या विक्रीत ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची नोंद केली. या उत्तम कामगिरीमधून द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांमधील या मॉडेलची वाढती लोकप्रियता दिसून येते. जीएसटी दरामध्ये कपातीमुळे ही वाहने अधिक परवडणारी आणि सुलभ झाली आहेत, तसेच विश्वासार्ह आणि मजबूत वाहतूक उपाययोजनांची मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये कंपनीला आपला विस्तार वाढवण्यास मदत झाली आहे.
स्पेशल व्हेईकल डिव्हिजनने (विशेष वाहन विभाग) कंपनीच्या विविध उत्पादनांची क्षमता सिद्ध करण्यास मदत केली आहे. यामध्ये भारतीय सैन्याला या वर्षात पुरवलेल्या ‘गुरखा’ वेईकलच्या ६०० युनिट्सच्या पहिल्या खेपेचा समावेश आहे. यामुळे संरक्षण दलांशी असलेले फोर्स मोटर्सचे जुने नाते अधिक दृढ झाले आहे, तसेच कठीण भूप्रदेश आणि आव्हानात्मक उपयोगांसाठी विशेष बनावटीची वाहने तयार करण्याची कंपनीची क्षमता अधिक दृढ झाली आहे.
या वर्षाच्या कामगिरीबाबत मत व्यक्त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, ”या वर्षातील आमच्या कामगिरीमधून आम्ही व्यवसायाला स्थिर गतीने देत असलेला आकार दिसून येतो. आम्ही अधिक लक्ष केंद्रित, शिस्तबद्ध आहोत. तसेच आमचा विश्वास आहे की, आम्ही नेतृत्व करू शकतो अशा विभागांशी संलग्न आहोत.
फोर्स अर्बनिया प्रीमियम सामूहिक वाहतूकीमध्ये नवीन मापदंड स्थापित करत आहे, तर ट्रॅक्स प्लॅटफॉर्म देशभरात कनेक्टीव्हीटी सुधारण्यामध्ये मदत करत


