Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedचैत्र पौर्णिमेनिमित्त द्राक्षांनी सजले लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर* श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर...

चैत्र पौर्णिमेनिमित्त द्राक्षांनी सजले लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर* श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट ; तब्बल ५० किलो द्राक्ष व इतर फळांची आरास

पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने चैत्र पौर्णिमा, गुरुवार आणि हनुमान जयंती असा त्रिवेणी योग एकाच दिवशी आल्याचे औचित्य साधत मंदिरात द्राक्षांची आरास करण्यात आली. प्रतिवर्षी प्रमाणे पंढरपूर येथील द्राक्ष बागायतदार प्रकाश कुलकर्णी यांचे तर्फे ही आरास करण्यात आली.

ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. शिवराज कदम जहागीरदार म्हणाले, सजावटीमध्ये ५० किलो द्राक्ष, २५ किलो खरबूज आणि २५ किलो कलिंगड लावण्यात आले. शुक्रवारी (दि.३) सुद्धा भाविकांना ही आरास पाहता येईल. शनिवारी या सर्व फळांचे विविध वृद्धाश्रम आणि अनाथालयांमध्ये वाटप करण्यात येणार आहे.

बाल हनुमानाची विविध फळांचा आस्वाद घेताना मनमोहक प्रतिमा भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. दत्त भक्त विजया गायकवाड आणि अंजली देशपांडे यांचे हस्ते चैत्र पौर्णिमेनिमित्त मासिक दत्त याग संपन्न झाला, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments