Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedउल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व* *संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा राज्यभर...

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व* *संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा राज्यभर यशस्वी*

पुणे, दि. 1 (जिमाका, वृत्तसेवा): केंद्र शासन पुरस्कृत “उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) राज्यातील सर्व जिल्ह्यांत रविवारी, दि. 29 मार्च 2026 रोजी यशस्वीरीत्या पार पडली.

सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत 2025-26 वर्षात उल्लास अँपवर नोंदणी केलेल्या असाक्षरांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. राज्यातील युडायस प्राप्त शाळांमध्ये मराठीसह नऊ माध्यमांत परीक्षा झाली. सुमारे 1.23 लाख व्यक्तींनी नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास 1 लाख परीक्षार्थींनी परीक्षा दिली.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून प्रमाणपत्र व गुणपत्रिका देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे आर्थिक, डिजिटल, कायदेविषयक साक्षरता तसेच आरोग्य, कुटुंब कल्याण व जीवन कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.

परीक्षेसाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरावर अधिकारी व प्रशासनाने परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिक्षक, मुख्याध्यापक व विविध यंत्रणांच्या सहकार्यामुळे ही परीक्षा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल शिक्षण संचालनालयाने सर्वांचे अभिनंदन केले आहे.
00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments