Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदिवासी क्षेत्र व समुदायाचा विस्तृत विकासावर भर द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

आदिवासी क्षेत्र व समुदायाचा विस्तृत विकासावर भर द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 6: (जिमाका वृत्तसेवा): जिल्हाधिकारी यांनी मत्स्यव्यवसाय वृद्धिंगत करण्याकरिता धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या सहयोजनेतर्गत पुणे जिल्ह्यातील सन 2025-26 करिता प्राप्त परिपूर्ण प्रस्तावांस पुढील कार्यवाहीस्तव मंजुरी प्रदान केली आहे.

या बैठकीस सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पुणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाचे प्रतिनिधी, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मत्स्यव्यवसाय घटक वृद्धिंगत करण्याकरिता “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही सह-योजना राबविण्यास शासन निर्णय क्रमांक-मत्स्यवि-1125/प्र. क्र.71/पदुम 14 दिनांक 4/9/2025 अन्वये मान्यता प्राप्त आहे.त्यानुषंगाने पुणे जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 99 गावांतील आदिवासी क्षेत्रातील इच्छुक लाभार्थींकडून प्रस्ताव मागणीस्तव जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानुषंगाने सदर प्राप्त प्रस्तावांची छाननी करून परिपूर्ण असलेले प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी तथा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जिल्हास्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती पुढे मंजुरीस्तव मांडण्यात आले होते.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही सहयोजना राबविण्यात येत असून या योजनेमध्ये जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 99 गावांचा धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या सहयोजनेत समावेश आहे.

आदिवासी क्षेत्र व समुदायाचा विस्तृत विकास करण्यासाठी मूळ पायाभूत सुविधा तसेच आर्थिक सबलीकरण होऊन सामाजिक प्रवाहात आणणे तसेच मत्स्य व्यवसाय वृद्धिंगत करणे हा योजनेचा मुख्य उद्देश असून जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवा, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केली आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments