Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedछत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे भव्य रक्तदान...

छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे भव्य रक्तदान मानवंदनेचे आयोजन ; १०० स्वराज्यघराण्यांचा आणि महाराष्ट्रातील शिवशंभू भक्तांचा सहभाग

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या बलिदान दिनी रक्तदानातून मानवंदना देण्यात आली. मानवंदनेचे हे सलग ११ वे वर्ष आहे. यावेळी जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी होणाऱ्या तब्बल १०० स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, ढोलताशा पथकांनी, क्रिडा संघटनांनी, गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान मानवंदनेत सहभाग नोंदवला.

शुभारंभ लॅान्स, म्हात्रे पुल डीपी रोड येथे मानवंदनेची सरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी रक्तदान मानवंदनेचे संकल्पक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, ईंशान गायकवाड, मंगेश शिळीमकर, प्रवीणभय्या गायकवाड, तसेच स्वराज्यघराण्यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

रक्तदान मानवंदनेच्या प्रारंभी दिग्वीजय जाधवराव, ईशान अमित गायकवाड, रिंकल अमित गायकवाड, गणेश पायगुडे, महेंद्र भोईटे, ऋषीकेश पासलकर, यश कंक, विराज कंक, सुनील जोगदंड, दादा भोसले आदित्य गरुड यांनी रक्तदान करुन केली.यावेळी रक्तदात्यांचा संकल्प पुर्ण झाला. पुणे ब्लड रक्तपेढीने रक्त संकलन केले.

अमित गायकवाड म्हणाले, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन ११ मार्च हा दिवस ‘मृत्युंजय रक्दान दिन’ म्हणुन महाराष्ट्र सरकारने जाहिर करावा अणि त्यादिवशी संपूर्ण महाराष्ट्राभर रक्तदान चळवळीतून संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी. ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा थेंबनथेंब अर्पण केला स्वराज्याच रक्षण करण्यासाठी, भारतभूमीच रक्षण करण्यासाठी, भारताच्या गौरवशाली संस्कृतीच रक्षण करण्यासाठी त्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना देऊया, रक्ताचं पांग रक्ताने फेडूयात, रक्ताचे रक्ताशी नात जोडूयात ही जाणीव जपत आम्ही सलग ११ वर्षे रक्तदान मानवंदना आयोजित करीत आहोत. भविष्यात राज्यव्यापी मानवंदनचे आयोजन करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments