*
पुणे : मुळव्याध, भगंदर सारखे आजार अतिशय कमी वेळात व अॅडमिट न होता बरे करता येतात, त्यासाठी लोकल भूल देऊन अनेक प्रकारचे ऑपरेशन करता येतात. याविषयीचे संशोधन पुण्यातील मुळव्याध तज्ञ डॉ. कुणाल कामठे यांनी इजिप्तमध्ये झालेल्या ‘पेल्विक फोर डिसीजेस’ या विषयावरील १८ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केले.
इजिप्तमधील कैरो येथे ही आंतरराष्ट्रीय परिषद झाली. लोकल भूल देऊन मूळव्याध आणि गुदगत भागातील ऑपरेशन करण्याचा शोध निबंध डाॅ. कामठे यांनी यावेळी मांडला. या शोधनिबंधासाठी डॉ. मीना शेख, डॉ. महेश संघवी, डॉ. रोहित संचेती, डॉ. दिपाली, डॉ. शर्मिला कामठे यांनी सहकार्य केले. भारतातून या आंतरराष्ट्रीय परिषद मध्ये डॉ. ब्रीज अग्रवाल, डॉ. समुद्री, डॉ. महेश सांगली यांची निवड झाली होती. मेडिटरीनियन सोसायटी ऑफ पेल्विक फ्लोर डिसऑर्डर्स आणि इजिप्शियन सोसायटी ऑफ कोलन अँड रेक्टम यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. जगभरातून २२ देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.
डाॅ.कामठे यांचे संशोधन ५ वर्षे सुरू होते. त्यांनी १८५० रुग्णांवर यशस्वी उपचार या माध्यमातून करण्यात आले आहेत. यादरम्यान सर्व रुग्णांवर लोकल भूल देऊन विविध प्रकारचे ऑपरेशन करण्यात आले. कोणत्याही रुग्णाला ऍडमिट न करता अगदी डे केअर पद्धतीने उपचार करण्यात आले होते. २०१३ -१७ या दरम्यानचा पूर्ण डेटा या संशोधनात घेतला होता, अशी माहिती कुणाल कामठे यांनी दिली.


