Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘विचार प्रबोधन पर्व-२०२६’...

क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘विचार प्रबोधन पर्व-२०२६’ पूर्वतयारीची नगरसदस्य व अधिकाऱ्यांकडून पाहणी

पिंपरी, दि. ९ एप्रिल २०२६ : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ११ एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ व सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील कार्यक्रमस्थळांवर करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा नगरसदस्य तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला.

नगरसदस्य डॉ. सुनील कांबळे, विकास डोळस, महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रोकडे, दत्ता गायकवाड, भाई विशाल जाधव, दिगंबर सुरवसे, शिरीष वाघमारे, सचिन गायकवाड, तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान कार्यक्रमस्थळावरील उभारण्यात आलेल्या सुविधा, स्वच्छता, प्रकाशयोजना, बसण्याची व्यवस्था, प्रवेशद्वार, वाहतूक नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला.

विचार प्रबोधन पर्वाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक, अनुयायी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व सुविधा सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आदी सुविधांवर भर देण्यात आला. कार्यक्रमस्थळी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांसाठी सुरक्षित, सुबक आणि सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments