Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedशहरात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश जारी*

शहरात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश जारी*

*

पुणे, दि. १० (जिमाका, वृत्तसेवा): वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याच्यादृष्टीने पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी पुणे शहरातील विविध वाहतूक विभागांतर्गत वाहतूक बदलाचे आदेश जारी केले आहे.

या आदेशानुसार कोंढवा वाहतूक विभागांतर्गत मंतरवाडी चौकाकडून येऊन होले वस्तीकडे जाणाऱ्या वाहनांनी उंड्री चौकातुन सरळ पुढे ६५ मीटर जाऊन यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे असे नमूद करण्यात आले आहे. तसेच वडाची वाडी गावाकडुन येऊन होले वस्ती कडे जाणाऱ्या वाहनांनी उंड्री चौकात डावीकडे वळण घेऊन पुढे ६५ मीटर जाऊन यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे. एन.आय.बी.एम. व होले वस्ती चौकाकडून येऊन खडी मशीन चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी उंड्री चीकात डावीकडे वळून २५ मीटर पुढे जाऊन यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.
खडी मशीन चौकाकडून येऊन वडाची वाडी गावाकडे जाणाऱ्या वाहनांनी उंड्री चौकातून सरळ पुढे २५ मीटर जाऊन यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.

येरवडा वाहतूक विभागांतर्गत शादलबाबा चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून येणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळून चंद्रमा चौकाकडे जाण्यासाठी असलेला सिग्नल हा बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी सदर वाहनांनी डॉ. बाबासाहेच आंबेडकर चौकातून आंळदी रोड जक्शन मार्गे इच्छित स्थळी जावे. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त श्री. जाधव यांनी कले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments