पुणे : सूरज लाहोटीची फटकेबाजी आणि कन्हैया लढ्ढाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर हाय-बाइट चॅलेंजर्स संघाने पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ (जिल्हा युवा समिती) यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग (बेहडे पीएमपीएल) क्रिकेट स्पर्धेत स्मॅशर योद्धाज संघावर १६ धावांनी मात केली.
नेहरू स्टेडियमवर ही लढत झाली. हाय-बाइट चॅलेंजर संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १२ षटकांत ३ बाद १२६ धावा केल्या. आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर सूरजने २३ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह नाबाद ४४ धावा केल्या, तर श्रीराम चंडकने १६ चेंडूंत दोन चौकार व एका षटकारासह नाबाद २५ धावा केल्या. या जोडीने ३६ चेंडूंत ७३ धावांची अभेद्य भागीदारी रचली. स्मॅशर योद्धाज संघाला ७ बाद ११० धावाच करता आल्या. वरुण भुतडाने २३ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह ४२ धावांची खेळी केली. मात्र, ती अपूर्ण ठरली.
इतर लढतींत मास्टर स्मॅशर्स संघाने सारडा स्टॅलियन संघावर चार गडी राखून मात केली. सारडा स्टॅलियन संघाला ६ बाद ७९ धावाच करता आल्या. मास्टर स्मॅशर्स संघाने विजयी लक्ष्य १०.५ षटकांत सहा गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यानंतर प्रारव पँथर्स संघाने मोल्डर्स संघावर चार गडी राखून मात केली. मोल्डर्स संघाने ५ बाद ११६ धावा केल्या. हर्ष दरकच्या अर्धशतकाच्या जोरावर प्रारव पँथर्सने विजयी लक्ष्य ११.२ षटकांत सहा गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक : हाय-बाइट चॅलेंजर्स – १२ षटकांत ३ बाद १२६ (सूरज लाहोटी नाबाद ४४, श्रीराम चंडक नाबाद २५, सर्वेश भट्टड १७, अभय जाजू ३-०-१९-२, हितेश मल ३-०-३०-१) वि. वि. स्मॅशर योद्धाज – १२ षटकांत ७ बाद ११० (वरुण भुतडा ४२, सूरज मालपाणी २९, सुदर्शन हरकुट ३-०-२७-२, कन्हैया लढ्ढा २-०-१६-३). मॅन आॅफ दि मॅच- कन्हैया लढ्ढा
सारडा स्टॅलियन – १२ षटकांत ६ बाद ७९ (मधुसुदन कलंत्री ३६, रोहित राठी १३, केदार बजाज ३-०-६-२, हर्ष झंवर २-०-१८-२, कुमोद धूत २-०-१४-१) पराभूत वि. मास्टर स्मॅशर्स – १०.५ षटकांत ६ बाद ८० (केदार बजाज नाबाद २१, प्रथमेश मालपाणी १८, मधुसुदन कलंत्री २-०-१२-२, रोहित राठी २-०-१३-१). मॅन आॅफ दि मॅच- केदार बजाज
मोल्डर्स – १२ षटकांत ५ बाद ११६ (अंकित लढ्ढा नाबाद ४०, प्रथमेश झवर २१, निखिल पलोद १३, अंकित बजाज ३-०-३१-२, हर्ष दरक २-०-४-१, धीरज मंत्री ३-०-१९-१) पराभूत वि. प्रारव पँथर्स – ११.२ षटकांत ६ बाद ११७ (हर्ष दरक ५५, धीरज मंत्री १३, नितीश मनियार १३, नीलेश राठी ३-०-२२-२, अमित बिहानी २-०-२३-२). मॅन आॅफ दि मॅच-हर्ष दरक
—


