भारत, १५ एप्रिल, २०२६: रोजगार बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या नवीन पदवीधरांसाठी संधी नेमकी कुठे आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. बदलत्या रोजगार स्वरूपाशी जुळवून घेण्यास त्यांना मदत करण्यासाठी जगातील सर्वात मोठे व्यावसायिक नेटवर्क लिंक्डइनने आपला ‘ग्रॅड्स गाइड २०२६’ अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात भारतातील सर्वात वेगाने वाढणारी पदे, उद्योग आणि ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे. लिंक्डइनच्या आकडेवारीनुसार एआय स्पेशलिस्ट, जनरेटिव्ह एआय इंजिनिअर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर यांसारख्या पदांसाठी तरुण प्रतिभेला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.
व्यवसाय आणि कर्मचारी-केंद्रित क्षेत्रांमध्ये वाढत्या संधी
तरुण प्रोफेशनल्ससाठी संधी फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरती मर्यादित न राहता आता व्यवसाय-उभारणी आणि कर्मचारी-केंद्रित उद्योग व विभागांमध्येही विस्तारत आहेत. करिअरची सुरुवात करणाऱ्यांसाठी आता युटिलिटीज हे शिक्षण, सरकारी प्रशासन, वाहतूक व लॉजिस्टिक आणि ऊर्जा तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांसह वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक ठरले आहे. तसेच मानवी संसाधन (एचआर), सल्लागार, माहिती तंत्रज्ञान, मार्केटिंग, प्रोग्राम व प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि व्यवसाय विकास या विभागांमध्येही प्रवेश-स्तरावरील संधी वाढत आहेत.
लिंक्डइन करिअर तज्ज्ञ आणि लिंक्डइन न्यूजच्या भारतातील वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक निरजिता बॅनर्जी म्हणाल्या, “आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या तरुण प्रोफेशनल्ससाठी सर्वात मोलाचा सल्ला म्हणजे अपारंपरिक मार्ग आणि अनपेक्षित ठिकाणी मिळणाऱ्या संधींसाठी नेहमी तयार राहा. योग्य संधी तुम्हाला अपेक्षित असलेल्या ठिकाणी मिळेल असे नाही. कदाचित एखाद्या वेगळ्या उद्योगात, नवीन शहरात किंवा अशा एखाद्या भूमिकेत असू शकते जिचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आजच्या गतिमान रोजगार बाजारपेठेत, जिथे एका क्षेत्रातील कौशल्ये दुसऱ्या क्षेत्रातही वापरली जाऊ शकतात, तिथे प्रोफेशनल्सनी स्वतःमध्ये वैविध्यपूर्ण कौशल्ये विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. करिअरच्या सुरुवातीचा काळ हा विविध भूमिका आणि उद्योगांमधील अनुभवांनी घडत असतो. पहिल्या नोकरीपर्यंतचा प्रवास नेहमी सरळ रेषेत असतो असे नाही, पण विविध अनुभवांसाठी तयार राहिल्यास तुम्हाला प्रगतीची गती मिळवता येईल आणि स्वतःसाठी योग्य क्षेत्र निवडता येईल.”
लिंक्डइन ग्रॅड्स गाइड २०२६ (LinkedIn Grads’ Guide 2026) नुसार पदवीधरांसाठी या वर्षातील सर्वात वेगाने वाढणारी पदे, क्षेत्रे आणि कार्यक्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत:
सर्वात वेगाने वाढणारी पदे
सर्वात वेगाने वाढणारी क्षेत्रे
सर्वात वेगाने वाढणारी कार्यक्षेत्रे
एआय स्पेशलिस्ट
युटिलिटीज
मानवी संसाधन (एचआर)
जनरेटिव्ह एआय इंजीनिअर
शिक्षण
सल्लागार
डिजिटल कंटेंट क्रिएटर
सरकारी प्रशासन
माहिती तंत्रज्ञान (आयटी)
ब्रँड प्रतिनिधी
वाहतूक आणि लॉजिस्टिक्स
मार्केटिंग
आयटी स्पेशालिस्ट
ऊर्जा तंत्रज्ञान
प्रोग्राम व प्रोजेक्ट मॅनेजमेंट
मीडिया प्रोडक्शन क्रू
बिड मॅनेजर
कॅटेगरी मॅनेजर
टेक्निकल सपोर्ट कंसल्टण्ट
स्टोरेज इंजीनिअर
लहान कंपन्या आणि निमशहरी भागांमध्ये नोकरभरतीचा वेग वाढला
रोजगार बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आता लहान कंपन्या या महत्त्वाच्या केंद्रांच्या रूपात समोर येत आहेत. त्यामुळे करिअरची सुरुवात करणाऱ्या तरुणांनी फक्त मोठ्या कंपन्यांचा किंवा ब्रँड्सचा विचार न करता या संधींकडे पाहणे गरजेचे बनले आहे. पदवीधरांसाठी १ ते १० कर्मचारी संख्या असलेल्या कंपन्यांमधील भरती २०२३ ते २०२५ दरम्यान ६४ टक्क्यांनी वाढली आहे, तर सर्वसाधारण एंट्री-लेव्हल श्रेणीतील भरतीमध्ये १६८ टक्के इतकी प्रचंड वाढ दिसून आली आहे. नोकरीच्या संधी आता फक्त मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित न राहता सर्वत्र उपलब्ध होत आहेत. विजयवाडा, भोपाळ, जयपूर, इंदौर, ग्वाल्हेर आणि वडोदरा ही शहरे आता मेट्रो शहरांच्या बरोबरीने भारताच्या मुख्य नोकरभरतीचा भाग बनली आहेत. यामुळे करिअरची सुरुवात करणाऱ्यांना पारंपारिक जॉब हब्सच्या पलीकडे अनेक नवीन पर्याय उपलब्ध होत आहेत.
इंटर्नशिपच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षांना चालना
२०२३ ते २०२५ या काळात प्रत्येक कार्यक्षेत्रात एंट्री-लेव्हलवर भरती झालेल्या उमेदवारांपैकी इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्यांचे प्रमाण २०२० ते २०२२ च्या तुलनेत अधिक होते. लिंक्डइनच्या आकडेवारीनुसार कायदा, उत्पादन व्यवस्थापन, सल्लागार, इंजिनिअरिंग आणि व्यवसाय विकास या क्षेत्रांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. पदवीनंतर इंटर्नशिपचे प्रमाणही वाढत आहे, विशेषतः प्रोग्राम व प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, आयटी, मीडिया आणि मार्केटिंग या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे.
तुम्ही तुमच्या करिअरची नुकतीच सुरुवात करत असाल, तर लिंक्डइन करिअर एक्सपर्ट निरजिता बॅनर्जी यांनी दिलेल्या काही टिप्स तुम्हाला रोजगार बाजारपेठेत आत्मविश्वासाने वावरण्यास मदत करू शकतात:
● ‘अज्ञात’ रोजगार बाजारपेठेमधील संधी सोडू नका: तुमची कौशल्ये तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण आहेत. लिंक्डइनचे एआय-आधारित जॉब सर्च अशा भूमिका शोधण्यासाठी डिझाइन केले आहे, जे तुमच्या पार्श्वभूमीशी जुळतात, अगदी अशा उद्योगांमध्येही ज्यांचा तुम्ही कधी विचार केला नसेल. हे वैशिष्ट्य सध्या इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज आणि जर्मन भाषेत उपलब्ध होत आहे.
● यश मिळण्याची शक्यता जास्त आहे अशाच ठिकाणी प्रयत्न करा: सर्वच ठिकाणी अर्ज करण्याऐवजी अशा भूमिकांना प्राधान्य द्या, जिथे तुमची कौशल्ये उत्तम प्रकारे जुळतात. लिंक्डइन जॉब मॅच सारखी साधने तुम्हाला कुठे योग्य संधी आहे हे पटकन शोधण्यात मदत करतात, ज्यामुळे तुम्ही निवड होण्याची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी अर्जांवर अधिक वेळ देऊ शकाल.
● फक्त क्षमता नाही, तर पुरावा दाखवा: तुमच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव नसेल तरी हरकत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय करू शकता हे दाखवून द्या. तुमचे प्रोजेक्ट्स, कामाचे नमुने आणि तुम्ही आत्मसात केलेली कौशल्ये शेअर करा. तुम्ही वापरत असलेले एआय टूल्स जसे लव्हेबल किंवा रिप्लीट यांची पडताळणी केल्यास नियोक्त्यांना तुमची क्षमता लवकर लक्षात येते.
● नियोजन करा आणि सातत्य राखा: अर्ज केल्यानंतर अनेकदा आपल्याला संभ्रमात असल्यासारखे वाटते. अशा वेळी तुमच्या अर्जाची स्थिती आणि फॉलो-अपचा मागोवा घेण्यासाठी लिंक्डइनच्या जॉब ट्रॅकरचा वापर करा. तसेच, तुमच्या ओळखीच्या कोणाच्या मदतीने तुम्ही इतरांपेक्षा लक्ष वेधून घेऊ शकता, हे ओळखा.
● शिकण्यासाठी फॉलो करा: फक्त अशाच व्यक्तींशी कनेक्ट व्हा, ज्यांना तुम्ही ओळखता आणि ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे. इतर व्यक्तींसाठी फक्त ‘फॉलो’ बटण दाबा. यामुळे तुम्ही त्यांच्या पोस्ट पाहू शकाल आणि त्यांच्या मजकुराशी संवाद साधू शकाल. लिंक्डइनचे नवीन पीपल सर्च वैशिष्ट्य तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या प्रोफेशनल्सशी कनेक्ट होणे अधिक सोपे करते (सध्या फक्त अमेरिकेत उपलब्ध).
###


