Pune– दिनांक 16 एप्रिल 2026— विविध चॅनेल्सवरील मालिकांमधील कार्यक्रममधून दाखविण्यात येत असलेल्या प्रसंगामध्ये कुटुंब उध्वस्त होण्याचेच प्रसंग दाखविले जात आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या कौटुंबिक व्यवस्थेवर मोठया प्रमाणावर होतं असून, यापुढे चांगल्या संदेश देणाऱ्या मालिका न दाखविल्या गेल्यास एकदंरीतच कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी बुधवारी सायंकाळी एका कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलताना दिला.
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट, पुणे यांच्यातर्फे श्री स्वामी अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 15एप्रिल 2026 ते 19एप्रिल 2026 पर्यंत भवानी पेठेतील घसेटी पुलाजवळ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ बाल उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले. श्री उल्हासदादा पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी श्री पवार बोलत होते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार चोरडिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, मैत्री ट्रस्टचे कार्यवाह व लेखक राजन मोहाडीकर, श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त जगन्नाथ लडकत, प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक व नवोदित चित्रपट कलावंत शिवराज वायचळ यांचा त्यांच्या कार्याबद्दल ट्रस्टतर्फे प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते खास पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, हार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते प्रविण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, संस्कृती बालगुडे, देऊळबंद 2 या चित्रपटाचे निर्माते दिलीप वाणी, अक्कलकोट येथील स्वामी अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जनमेजयराजे भोसले तसेच माजी नगरसेवक आबा बागुल, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक संजय बालगुडे,माजी उपमहापौर डॉ सतीश देसाई, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविणसिंग परदेशीं, विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे, नगरसेवक विशाल धनवडे, राजेंद्र काकडे, सुनिल रुकारी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेंच आगामी प्रदर्शित होतं असलेल्या देऊळबंद –2 या चित्रपटाच्या पोस्टर्सचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी या चित्रपटाचे कलावंतही उपस्थित होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार आपल्या भाषणात म्हणाले की, पूर्वी चित्रपट व चॅनेल्सवरील मालिका जनतेला डोळ्यासमोर ठेऊन खास प्रबोधनंत्मक संदेश देणारे चित्रपट व मालिका तयार करत होते.सध्याच्या विविध चॅनेल्सवरील मालिका मात्र चांगला संदेश देण्याऐवजी कुटुंब व्यवस्था उध्वस्त होणाऱ्या मालिका विविध चॅनेल्सवरून प्रसारित करत असतात. त्याचा परिणाम मोठया प्रमाणावर महिलांवर होताना दिसत आहे. व कुटुंबावर होतं आहे.
हे कुठेतरी थांबले पाहिजे. या सर्वांचा विचार मालिका निर्माते, दिग्दर्शक, व कलावंतानी केला पाहिजे.
प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी म्हणाले की, ट्रस्टतर्फे आम्हाला पुरस्कार देऊन खास सन्मान करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला आणखी चांगले कार्य करण्यासाठी मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष वीरेंद्र किराड यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले की, हा सांस्कृतिक महोत्सव गेली 31 वर्षे अविरतपणे चालवला जात आहे. या महोत्सवाद्वारे सामाजिक व सांस्कृतिक जडनघडणं करण्याचे प्रयत्न केले जात आहे.
प्रियंका किराड व सौ स्वाती किराड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सिद्धार्थ बेंद्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात सत्कार व सन्मान झालेल्या सत्कारार्थीनीही आपले मनोगत भाषणाद्वारे केले.
————————————
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट, पुणे यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन संपन्न
RELATED ARTICLES


