चेन्नई, तामिळनाडू – १६ एप्रिल २०२६: इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडने आज स्टायलिश फॅसिनो 125 एफआय हायब्रीड मधील महत्त्वाच्या डिझाइन बदलांची घोषणा केली. यासह आजच्या तरुणांच्या आणि फॅशनबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी पूर्ण करण्याप्रती यामाहाची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. आधुनिक जीवनशैली आणि फॅशन निवडींना सादर करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली नवीन फॅसिनो मध्ये एक सुटसुटीत आणि अधिक समकालीन रचना आहे, जी तरुण पिढीला विशेषत्वाने भावते. ही नवीन स्कूटर आता पूर्वीपेक्षा अधिक ट्रेंडी झाली आहे, तसेच मागची लांबी कमी केल्यामुळे ही स्कूटर अधिक चपळ दिसते, ज्यामुळे शहरातील गर्दीच्या ठिकाणी चालवणे अधिक सोपे झाले आहे.
अपडेट केलेल्या फॅसिनोचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या स्कूटरची रिअर डिझाइन. आधुनिक सौंदर्याची आवड लक्षात घेऊन या स्कूटरची अतिशय विचारपूर्वक फेररचना करण्यात आली आहे. नवीन आकाराचा मागील भाग, पुनर्रचित टेललाइट्स, फ्लॅशर्स आणि वैशिष्ट्यपूर्ण व्ही-आयकॉनिक टेललाइट डिझाइन यामुळे या स्टायलिश स्कूटरला आता अत्याधुनिक, प्रीमियम आणि संतुलित लूक मिळाला आहे. फॅसिनोची कार्यक्षमता आणि परफॉर्मन्सचे मूळ गुणधर्म (डीएनए) कायम ठेवत स्कूटरची डिझाइन अधिक परिष्कृत आणि समकालीन करण्यात आली आहे, ज्यामुळे स्कूटर धावताना आणि उभी असतानाही उठून दिसते. यामध्ये करण्यात आलेले बदल आणि नवीन ग्राफिक्स यामाहाच्या भारतातील आरअँडडी टीमने संकल्पित आणि डिझाइन केले आहेत. हे बदल प्रत्यक्ष ग्राहकांच्या अभिप्रायावर आधारित आहेत, ज्यामधून यामाहाची ग्राहक-केंद्रित आणि डिझाइन-प्रेरित दृष्टिकोनाप्रती कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
या अपग्रेडबाबत मत व्यक्त करत यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्यक्ष श्री. हाजिमे आओता म्हणाले, “यामाहा फॅसिनोच्या या प्रवासामधून आमच्या ग्राहकांसोबत विकसित होत राहण्याप्रती आमची निरंतर समर्पितता दिसून येते. आमचा १.५ दशलक्ष उत्पादनाचा टप्पा आमच्या उत्पादनांवर असलेल्या विश्वासाचा एक भक्कम पुरावा असला, तरी आम्ही नवनवीन प्रयोग करण्यास सदैव कटिबद्ध आहोत. आजच्या तरुणांच्या आवडीनिवडी या अधिक वैविध्यपूर्ण आणि सुसंस्कृत शैलीकडे झुकत आहेत, हे लक्षात घेऊन नवीन फॅसिनोचे रूपांतर एका ट्रेंडसेटिंग आणि युनिसेक्स (महिला-पुरुष दोघांसाठी योग्य) गतीशीलता सोल्यूशनमध्ये करण्यात आले आहे. आमच्या भारतातील आरअँडडी टीमच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अपडेटमुळे ही सुधारित डिझाइन आणि विश्वासार्ह हायब्रिड परफॉर्मन्स अशा प्रत्येक रायडरला आकर्षित करेल, जो नाविन्यता आणि उपयुक्तता यांचा परिपूर्ण संगम शोधत आहे. आम्हाला विश्वास आहे की, फॅसिनोचा हा नवीन अध्याय भारतातील शहरी भागात स्कूटर राइड करण्यासाठी दर्जा उंचावेल.”
गेल्या काही वर्षांमध्ये, ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार फॅसिनोमध्ये सातत्याने बदल होत गेले आहेत. २०१५ मध्ये शहरी प्रवाशांसाठी आकर्षक फॅशन असलेली एक स्टायलिश ११० सीसी युनिसेक्स स्कूटर म्हणून लॉन्च झालेली ही स्कूटर, २०१९ मध्ये फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानासह बीएस६ मानकांनुसार १२५ सीसी मॉडेलमध्ये रूपांतरित झाली, ज्यामुळे सुधारित कामगिरी आणि कार्यक्षमता मिळाली. २०२१ मध्ये, फॅसिनोमध्ये एक मोठे तांत्रिक अपग्रेड झाले आणि पॉवर असिस्टसह स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) तंत्रज्ञान सादर करून ती यामाहाची पहिली हायब्रीड स्कूटर बनली. २०२५ मध्ये एन्हांस्ड पॉवर असिस्ट, प्रगत कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि आन्सर बॅक फीचरच्या परिचयाने ही उत्क्रांती सुरूच राहिली, ज्यामुळे कामगिरी आणि कनेक्टिव्हिटी दोन्ही उंचावल्या.
‘फॅसिनो’चे यश त्याच्या १.५ दशलक्ष युनिट्सच्या उत्पादनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावरून स्पष्ट होते—हा एक असा पराक्रम आहे ज्याचा आनंद कंपनी या महिन्यात साजरा करत आहे. ही कामगिरी या मॉडेलने ग्राहकांमध्ये मिळवलेल्या प्रचंड लोकप्रियतेची, तसेच गेल्या काही वर्षांत यात करण्यात आलेल्या वेळेनुसार व आधुनिक सुधारणांची साक्ष देते.
फॅसिनो 125 एफआय हायब्रीड मध्ये यामाहाचे ब्लू कोर हायब्रिड १२५ सीसी, एअर-कूल्ड व फ्युएल इंजेक्टेड ४-स्ट्रोक एसओएचसी २-व्हॉल्व्ह इंजिनची शक्ती आहे, जे अधिक सुधारित परफॉर्मन्स आणि उत्तम इंधन कार्यक्षमता प्रदान करते. ही स्कूटर टेलिस्कोपिक सस्पेंशन, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ, २१-लिटर अंडर-सीट स्टोअरेज, ई20 इंधन सुसंगतता आणि विविध दर्जात्मक सोईस्कर वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. १७८० मिमी इतकी कमी केलेली एकूण लांबी आणि स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी), सायलेंट स्टार्ट, स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम (एसएसएस) व एनहान्स्ड पॉवर असिस्ट अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये असलेली ही स्कूटर सुरुवातीच्या हालचालीत, भार वाहताना आणि चढणीच्या रस्त्यावर अधिक मजबूत अॅक्सेलरेशन देते, तसेच इंधनाची मोठी बचतही करते. याव्यतिरिक्त, प्रीमियम फॅसिनो एस व्हेरिएंटमध्ये कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, ज्यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि आन्सर बॅक यांसारखी कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये आहेत.
महिला-पुरुष दोघांनाही आकर्षित करणारी ही स्टायलिश स्कूटर अनेक ट्रेंडी रंगांमध्ये उपलब्ध आहे. ब्लू स्क्वेअर आउटलेट्ससह सर्व यामाहा शोरूममध्ये या स्कूटरची विक्री होईल. या स्कूटरची किंमत ७६,५०० रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते.
व्हेरिएंट
रंग
सुरूवातीची किंमत
Fascino S
मॅट ग्रे, मॅट ब्लॅक
९५,२००
Fascino Disc
कूल ब्लू मेटलिक, मेटलिक लाइट ग्रीन आणि डार्क मॅट ब्लू
८८,०००
Fascino Drum
विविड रेड, मेटलिक ब्लॅक, मेटलिक व्हाइट
७६,५००


