आयकॉनिक पल्सर 180 आता नवे ग्राफिक्स, एलईडी हेडलॅम्प, ब्लिंकर्स आणि ब्लूटूथ कनेक्टेड डिजिटल कन्सोलसह परतली असून तिची किंमत ₹1,22,490/- (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.
पुणे, 16 एप्रिल 2026 – बजाज ऑटो या जगातील सर्वात व्हॅल्यूएबल टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर कंपनीने आज भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आयकॉनिक मोटरसायकल्सपैकी एक असलेल्या पल्सर 180 च्या पुनरागमनाची घोषणा केली आहे! नव्या ग्राफिक्स, एलईडी हेडलॅम्प, ब्लिंकर्स आणि ब्लूटूथ कनेक्टेड डिजिटल कन्सोलसह सुसज्ज असलेली ही मोटरसायकल, रायडर्सच्या दमदार मागणीमुळे पुन्हा सादर करण्यात आली आहे. पल्सर ब्रँडच्या दोन महत्त्वाच्या मॉडेल्सपैकी पल्सर 150 आणि पल्सर 180 यांच्या लाँचला 25 वर्षे पूर्ण होत असताना, ही मोटरसायकल अधिक शार्प आणि विकसित अवतारात परतली आहे. या पुनरागमनामुळे पल्सर ब्रँडच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित झाला आहे.
भारतामध्ये पल्सर 180 लाँच करण्यात आली तेव्हा, परफॉरमन्स मोटरसायकलिंगमध्ये नवे मापदंड निश्चित झाले होते. उच्च सीसी मोटरसायकलच्या परफॉरमन्स आणि दैनंदिन वापरातील सोयी यांची सांगड घालण्यात आली. पल्सरने भारतात स्पोर्ट्स मोटरसायकलिंगचा नवा अध्याय सुरू केला. पल्सर 180ने पल्सर ब्रँडचा पाया घातला आणि त्याचा भक्कम वारसा निर्माण केला.
पल्सर 180ने पुन्हा एकदा साहसी वृत्ती परत आणली आहे. उठावदार स्टाइलिंग, अधिक विकसित परफॉरमन्स आणि एलईडी हेडलॅम्प, ब्लिंकर्स तसेच ब्लूटूथ कनेक्टेड डिजिटल कन्सोलसारख्या प्रगत फीचर्सच्या संगमातून अतुलनीय परफॉर्मन्स देण्यात येतो. 150–160ccची मोटरसायकल चालवणाऱ्या रायडर्ससाठी ही एक आकर्षक अपग्रेड म्हणून सादर करण्यात आली असून परफॉरमन्स, प्रभावी लुक आणि उपयुक्तता या तीनही बाबतीत ही मोटरसायकल पुढचा टप्पा ठरते.
या घोषणेबाबत बजाज ऑटो लि.च्या एमसीबीयूचे अध्यक्ष सारंग कानडे म्हणाले, “पल्सर ब्रँडने नेहमीच नवे मापदंड प्रस्थापित करण्याची आणि भारतातील परफॉर्मन्स मोटरसायकलिंगची नवी व्याख्या करण्याची भूमिका निभावली आहे. पल्सर 180चे पुनरागमन हे सातत्यपूर्ण आणि मजबूत मागणीला तसेच सोशल मीडियावर मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाला दिलेले उत्तर आहे. पल्सरला 25 वर्षे पूर्ण होत असताना, हे आयकॉनिक नाव पुन्हा सादर करणे आमच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. नव्या पिढीसाठी पुन्हा साकारलेली ही मोटरसायकल ‘डेफिनेटली डेअरिंग’ या आमच्या तत्त्वाचे प्रतिबिंब आहे, ज्यात पॉवर, अचूकता आणि आधुनिक डिझाइनची सांगड घालून उत्साहवर्धक आणि वापरण्यास सुलभ अनुभव दिला जातो.”
पल्सर ब्रँड दीर्घकाळापासून पॉवर, परफॉर्मन्स आणि वेगळेपणाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. सातत्याने नवे मापदंड निश्चित करत भारतातील परफॉरमन्स बाइकिंग संस्कृती घडवण्यात या ब्रँडची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.


