पुणे,१७ एप्रिल २०२६ : पालवीया फाऊंडेशन आणि नुक्कड कॅफे यांच्या तर्फे आणि विलू पुनावाला फाऊंडेशन यांच्या सहकार्याने पुस्तक महोत्सवाच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुस्तक महोत्सव 19 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 दरम्यान अक्षर पाऊल – स्माइलिंग लायब्ररी इनिशिएटिव्ह, बालग्राम एसओएस चिल्ड्रन्स व्हिलेज, पर्णकुटी आणि महात्मा फुले मंडई या विविध ठिकाणी सुरू राहणार आहे. यंदाच्या पुस्तक महोत्सवाची संकल्पना लिटरेचर इन ॲक्शन ही असून शब्द कशा प्रकारे समाजात परिवर्तन आणू शकतात,समुदाय घडवू शकतात आणि अर्थपूर्ण परिणाम घडवून आणू शकतात हेच या महोत्सवातून सादर केले जाणार आहे.
या महोत्सवामध्ये अनाथालये,वंचित मुलांसाठीच्या सामुदायिक ग्रंथालयांपासून ते सेक्स वर्कर्सच्या मुलांसाठीच्या शालेय केंद्रांपर्यंत हा महोत्सव साहित्याला वास्तविक जीवनाशी जोडणारा आहे. या उपक्रमाद्वारे लोक खऱ्या अर्थाने संवाद साधू शकतात,नाती निर्माण करू शकतात आणि परिवर्तन घडवू शकतात.
साहित्याच्या विविध रूपांतून विशेषत: वंचित घटकांतील मुलांना प्रेरणा देणे,दिव्यांग व्यक्तींना संधी उपलब्ध करून देणे,सामाजिक स्थळांचे मुल्य वाढवणे आणि व्यापक समाजाला प्रेरित करणे हा या उपक्रमामागील हेतू आहे.
याप्रसंगी बोलताना पालवीया फाऊंडेशन आणि नुक्कड कॅफेचे संस्थापक वैभव पालीवाल म्हणाले की, आज आपल्याला येणारे अनुभव उद्या लोकांच्या कथेमध्ये रूपांतरित होऊ शकतात.या महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही लोकांना साहित्याकडे केवळ पानांवरचे शब्द म्हणून न पाहता जीवन, दृष्टीकोन आणि समुदाय घडवणारी उर्जा म्हणून लोकांनी पाहावे,अशी आमची इच्छा आहे.
या पुस्तक महोत्सवामध्ये कहानी बाजार,कहानियों की पोटली,शी स्पोक द वर्ल्ड चेंज्ड, कहानी की तरह,कहानी भी खेल भी,कहानियों का ब्रह्मांड,खिलौनों की कहानी,सेन्सरी एक्सप्रेशन,वर्डस दॅट मुव्हड द वर्ल्ड,लिटल नेचर राईटर्स अशा प्रकारचे विविध उपक्रम सादर केले जाणा
र आहेत.


