Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रत्येकाने कुटुंबाची लक्ष्मण रेषा बळकट करण्याची गरज ‘बुवा आणि बाया’ परिसंवादात...

प्रत्येकाने कुटुंबाची लक्ष्मण रेषा बळकट करण्याची गरज ‘बुवा आणि बाया’ परिसंवादात तज्ज्ञ मंडळीचे मत आपलं घर संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. २०, एप्रिल, २०२६ : आजच्या युगात सगळेजण यशाच्या मागे धावत आहेत. त्यामुळे ताणतणाव, दबाव या गोष्टी वाढत आहेत. त्यापासून सुटका करून अनेकजण नव्याने उभ्या राहत असणाऱ्या गुरु सदृष्य व्यवस्थांचा आधार घेत आहेत. यापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची लक्ष्मणरेषा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे मत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी व्यक्त केले.

 

आपलं घर संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरच्या सभागृहात संस्थेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ‘बुवा आणि बाया’ या विषयावर परिसंवादात तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. यामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे, अॅड. विभावरी बिडवे आणि जेष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी सहभाग घेतला.

मुलाखतकार एन. सी. गोसावी यांनी त्यांच्याबरोबर संवाद साधला.

 

या विशेष कार्यक्रमामध्ये बालरंगभूमी परिषद, नागपूर याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबदल्ल श्याम आस्करकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. वैभव फळणीकर फाऊंडेशनला एकाच दिवशी ९८२ दिव्यांगांना कृत्रिम हात व पाय बसवून दिल्याबद्दल गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र देखील यावेळी प्रदान करण्यात आले. शिवाय संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक विजय फळणीकर यांनी लिहिलेल्या ‘पराजय नव्हे विजय’ या पुस्तकाच्या चौदाव्या आवृत्तीचे प्रकाशन सुद्धास कार्यक्रमादरम्यान करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्षा सुप्रिया दामले, विश्वस्त साधना फळणीकर, प्रसिद्ध नाट्य लेखक श्याम आस्करकर आणि संस्थेचे अन्य विश्वस्त उपस्थित होते.

 

आज सर्वच क्षेत्रामध्ये बुवा विकृती आहे. त्यामुळे आपल्याला अशा गोष्टीपासून दूर राहायचे असेल तर मुलांवर घरामध्ये चांगले संस्कार करण्याची आवश्यकता आहे. उत्तम मूल्याधिष्टित जीवन जगण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आपली मुले ज्या ठिकाणी जातात तिथे पालकांनी दोन महिन्यातून एकदा तरी भेट देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यावर सतत नजर ठेवणे त्यांच्याबरोबर संवाद साधणे, अशा गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले तर सगळ्याच भागातील बुवाबाजीला मूठमाती देऊन सुरक्षित जीवन जगणे शक्य होणार आहे. आपल्याला चार पैसे कमी मिळाले तरी चालेल पण चारित्र्य चांगले असायला हवे, असे डॉ. चारुदत्त आफळे यावेळी म्हणाले.

 

समाजामध्ये फसवणूक, लुबाडणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत, त्याला महिला आणि पुरुष बळी पडत आहेत. मानसिक आणि सामाजिक कारणांकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महिलांना समानतेने वागणूक देण्याची गरज असल्याचे अॅड. विभावरी बडवे यावेळी म्हणाल्या.

 

प्रसिद्ध नाटककार प्र. के. अत्रे यांनी १९६४ मध्ये ‘बुवा तिथे बाया’ हे नाटक लिहिले होते, त्या काळात देखील बुवाबाजी होती. आज त्या गोष्टीला ६२ वर्ष होऊन गेली आहेत. त्या काळात देशात २७ विदयापीठे होती. आज ही संख्या एक हजार ३५० पर्यंत जाऊन पोहचली आहे. कॉलेजेस देखील ५०० होती. आज त्यांची संख्या ५२ हजार झाली आहे. तेव्हा साक्षरतेचे प्रमाण १८ टक्के होते, आज ते ८० टक्यापर्यंत जाऊन पोहचले आहे. याकडे नीट पहिले तर साक्षरता आणि अंधश्रद्धा यांचा काही संबंध नाही. आजच्या युगात अस्थिरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, त्यापासून सुटका करून घेण्यासाठी लोकांना आधार हवा आहे, त्यामुळे बुवाबाजीकडे कल वाढत असून त्यामधून बाबा इंडस्ट्रीचा उदय होत असल्याचे मत सुनील माळी यांनी व्यक्त केले.

 

‘आपलं घर’चा रौप्यमहोत्सव कसा झाला हे समजलेच नाही. २५ वर्षाच्या काळात झोकून देऊन काम केले. त्यामुळे आपली संस्था काही दिवसांपूर्वीच सुरु झाली आहे असे वाटत असल्याचे विजय फळणीकर यावेळी म्हणाले.आपण उपेक्षितांच्या अंतरंगात डोकावून पाहायला हवे, दुसऱ्यांसाठी काम करताना वेगळा आनंद मिळत असल्याचे फळणीकर यांनी आपल्या प्रस्तावनेत संगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. सुप्रिया दामले यांनी आभार मा

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments