Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रसेनजीत फडणवीस यांचा सन्मान सोहळा मंगळवारी (दि.२१)* रिझर्व बँक ऑफ इंडिया...

प्रसेनजीत फडणवीस यांचा सन्मान सोहळा मंगळवारी (दि.२१)* रिझर्व बँक ऑफ इंडिया सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे यांची उपस्थिती ; आधार सोशल फाउंडेशन आणि प्रसेनजीत फडणवीस मित्र परिवार यांच्यावतीने आयोजन

 

 

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्राच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रसेनजीत फडणवीस यांचा सन्मान आणि अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आधार सोशल फाउंडेशन आणि प्रसेनजीत फडणवीस मित्र परिवार यांच्यावतीने मंगळवार, दिनांक २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता डेक्कन येथील गोखले इन्स्टिट्यूट जवळील मानव विकास संस्था (सारथी) पुणे येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

रिझर्व बँक ऑफ इंडिया सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते प्रसेनजीत फडणवीस यांचा सन्मान होणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप महामंत्री राजेश पांडे, जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र हिरेमठ, रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, राज्य सह. निवडणूक प्राधिकरणाचे निवृत्त सह आयुक्त संजय खडके यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे, अशी माहिती आयोजक दिलीप काळोखे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments