Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमधुमित्र मधुमक्षी पुरस्कारासाठी नामांकन अर्ज करण्याचे आवाहन* *एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखीव* 

मधुमित्र मधुमक्षी पुरस्कारासाठी नामांकन अर्ज करण्याचे आवाहन* *एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखीव* 

 

 

पुणे, दि. २१ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यावतीने सन २०२६ या वर्षाकरिता “मधुमित्र मधुमक्षी पुरस्कार” देण्यात येणार आहेत; याकरिता नामांकन अर्ज ४ मे २०२६ अखेर सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासोबतच मध उत्पादकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंडळाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपालकांचा सन्मान करण्यात येतो.

 

या पुरस्कारात प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार दिले जाणार असून, त्यापैकी एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखीव आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार व तृतीय ५ हजार रुपये अशी आहे.

 

जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य (२० मे) साधून जिल्ह्यास्तरीय कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.पुरस्काराची लिंक https://mskvib.org संकेस्थळावर आहे. नामांकन अर्ज जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयाशी (संपर्क क्रमांक ०२०-२५८११८५९) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments