Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedअल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची* *पुण्यात दि. २४ एप्रिल...

अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची* *पुण्यात दि. २४ एप्रिल रोजी स्थापना*

 

 

पुणे शहरातील अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यापारी यांच्या ‘मायनोरटी अँड इंडियन ख्रिचन मेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री’ हि अधिकृत स्थापना शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता. मारिया असुंटा कोन्वेंट हॉल, रुबी हॉल क्लिनिक समोर, संजीवनी आश्रमा समोर, ढोले पाटील रोड, पुणे येथे समारंभपूर्वक संपन्न होणार आहे. बिशप सायमन अल्मेडा, बिशप अल्फ्रेड तिवाडे आणि इंडो इस्त्रायल चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष गुल क्रिपलानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहतील अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लुकस केदारी यांनी दिली.

 

या कार्यक्रमास सर्व राजकीय, सामाजिक, व्यवसायिक नेते,काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश दादा बागवे, एनआयसीएचई चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विशाल मोरेश्वर, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर,मोहन जोशी, प्रशांत जगताप, राहुल डंबाळे, खिसाल जाफरी हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील.

यासोबतच महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, आयोगाच्या माजी उपाध्यक्षा जेनेट डिसूझा, संस्थेचे अध्यात्मिक संचालक फादर एन्थोनी डिसूझा आणि पीटर जॉर्ज तसेच मारिया गोरेट्टी आणि उद्योगपती पीटर डिसूझा हे देखील उपस्थित राहणार आहेत.

 

पुण्यासारखे प्रमुख शहर उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रात अग्रेसर असून पुण्यात अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजाचे असंख्य उद्योजक व व्यावसायिक आहेत. त्यांचे संघटन करणे त्यांच्या अडचणींमध्ये मार्गदर्शन करणे व नवीन उद्योजक व व्यावसायिक तयार होण्यासाठी प्रयत्न करणे हे संस्थेचे उद्देश असून संस्थेच्या स्थापनेनंतर किमान १००० सदस्य संख्या होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर या मॉडेलचा अनुभव लक्षात घेत महाराष्ट्रात प्रत्येक मोठ्या शहरात आणि तालुका व जिल्ह्यामध्ये संस्थेच्या शाखा उघडल्या जातील. असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लुकस केदारी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments