Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदरेज इंडस्ट्रीजचे नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख; २०३१ पर्यंत ₹५,००,००० कोटींचे...

गोदरेज इंडस्ट्रीजचे नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख; २०३१ पर्यंत ₹५,००,००० कोटींचे उद्दिष्ट 

 

‘१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची’ (Crafting tomorrow since 1897) हे कंपनीचे सामायिक ध्येय

 

मुंबई, २२ एप्रिल, २०२६: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपले नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख प्रस्तुत केली. ग्रुपच्या उत्क्रांतीमधील हा एक निर्णायक क्षण असून, यातून नवी ओळख, धोरण आणि महत्त्वाकांक्षा यांचा भविष्यातील प्रगतीशी मेळ घातला गेला आहे. १२९ वर्षांचा प्रदीर्घ वारसा आणि नव्या स्वरूपातील आधुनिक ऊर्जेने प्रेरित ही ओळख, समूहाच्या कंज्यूमर प्रॉडक्ट्स, रिअल इस्टेट, फायनान्शिअल सर्व्हिसेस, ॲग्रीकल्चर आणि केमिकल्स अशा वैविध्यपूर्ण व्यवसायांमध्ये एक स्पष्ट धोरणात्मक ताळमेळ प्रस्थापित करते. या ऐतिहासिक बदलाची घोषणा मुंबईतील ‘गोदरेज वन’ या समूहाच्या मुख्यालयात आयोजित मीडिया बैठकीत करण्यात आली.

 

या बदलाच्या केंद्रस्थानी समूहाचे नवीन ध्येय आहे — “१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची”. ही दृष्टी समूहाचा ऐतिहासिक वारसा आणि नाविन्य व उत्तरदायित्व यांच्या संगमातून ‘शाश्वत मूल्य’ निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेचे दर्शन घडवते. हे ध्येय समूहाचे संस्थापक अर्देशिर गोदरेज यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे, ज्यांनी सदैव आधुनिकता आणि मूल्ये यांचा अतुलनीय समतोल राखला. समूहाने आपल्या तीन मुख्य मूल्यांचा — विश्वास संपादन करणे, आनंद निर्माण करणे आणि धाडसी बनणे — पुनरुच्चार केला आहे, जी मूल्ये संपूर्ण संघटनेत नेतृत्व आणि निर्णय प्रक्रियेसाठी मार्गदर्शक ठरतील.

 

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे नियुक्त अध्यक्ष (Chairperson Designate), पिरोजशा गोदरेज म्हणाले, “’१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची’ हे ब्रीदवाक्य आमचा हा विश्वास अधोरेखित करते की, मूल्ये आणि परिणाम सदैव हातात हात घालून चालले पाहिजेत. जसा आमचा विस्तार होत आहे, हीच विचारधारा आम्हाला असे व्यवसाय उभारण्यासाठी प्रेरणा देत राहील जे यशस्वी असण्यासोबतच जबाबदारीचेही भान राखतील.”

 

समूहाने प्रगतीचा एक भक्कम ‘ट्रॅक रेकॉर्ड’ सादर केला आहे, ज्यामध्ये गेल्या पाच वर्षांत विक्री आणि निव्वळ नफा या दोन्हीमध्ये २०% हून अधिक ‘चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर’ (सीएजीआर) नोंदवला गेला आहे. समूहाने विकासाच्या पुढील टप्प्यासाठी स्पष्ट उद्दिष्टे निश्चित केली आहेत, ज्यामध्ये १५% पेक्षा जास्त वार्षिक विक्री वाढ आणि प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस) मध्ये २०% पेक्षा जास्त वाढीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक व्यवसायाकडून ‘स्टेडी स्टेट’मध्ये १८% पेक्षा जास्त इक्विटी परतावा अपेक्षित आहे. समूहाचा मानस आपल्या तीन सार्वजनिक सूचीबद्ध कंपन्यांची (कंझ्युमर प्रॉडक्ट्स, प्रॉपर्टीज आणि ॲग्रोवेट) संख्या पाचपर्यंत वाढवण्याचा आहे. या पावलांमुळे पुढील पाच वर्षांत एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ₹५,००,००० कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

 

समूहाच्या विकास धोरणांचा आधार हा दृढ विश्वास आहे की, भक्कम आर्थिक कामगिरी आणि समाज व पर्यावरणावरील सकारात्मक परिणाम हे एकमेकांना पूरक असले पाहिजेत. २०२५ मध्ये, ‘डाऊ जोन्स बेस्ट-इन-क्लास सस्टेनेबिलिटी इंडेक्स’ मध्ये गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि गोदरेज प्रॉपर्टीज या दोघांनीही आपापल्या श्रेणींमध्ये जागतिक स्तरावर प्रथम स्थान पटकावले. याच पायावर भर देत, समूहाने २०३५ पर्यंत ‘नेट-झिरो’ ऑपरेशन्स (स्कोप १ आणि २) आणि २०४७ पर्यंत ‘प्लॅनेट-पॉझिटिव्ह’ सप्लाय चेनचे उद्दिष्ट ठेवले आहे. याशिवाय, आगामी पाच वर्षांत समूहामध्ये महिला, LGBTQ+ समुदाय आणि दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधित्व ४०% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे—जे गोदरेज प्रॉपर्टीज आणि समूहाच्या कॉर्पोरेट केंद्राने आधीच साध्य केले आहे. तसेच, २०२५ मध्ये ‘गोदरेज फाउंडेशन’ने (ज्यांची गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपमध्ये १५% भागीदारी आहे) एक मोठा ‘कॅश कॉर्पस’ तयार केला आहे, ज्यामुळे त्यांना आपला वार्षिक परोपकारी खर्च (philanthropic spend) पूर्वीच्या तुलनेत ५ पटीने वाढवता येईल.

 

आपल्या नवीन ध्येयासोबतच, समूहाने एका नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण केले आहे, जी समूहाच्या ‘DISCO’ या इन-हाउस डिझाइन टीमने साकारली आहे. ही ब्रँड ओळख अधिक एकात्मिक आणि भविष्याचा वेध घेणारी कॉर्पोरेट ब्रँड प्रणाली तयार करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. यामध्ये नवीन व्हिज्युअल भाषा, विशेष टाइपोग्राफी (GI Sans), एक खास सोनिक (ध्वनी) ओळख आणि एका ‘सिग्नेचर’ सुगंधाचा समावेश आहे—जे डिजिटल, भौतिक आणि अनुभवात्मक स्तरावर एक सुसंगत आणि बहु-संवेदी (multi-sensory) अभिव्यक्ती प्रदान करते.

 

गोदरेज इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी, तान्या दुबाश म्हणाल्या, “ही नवी ब्रँड ओळख आम्ही कोण आहोत आणि आम्ही कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत याचे प्रतिबिंब आहे. हे गोदरेज ब्रँडच्या सामर्थ्याला अधिक बळकटी देते आणि त्याच वेळी भविष्यातील आमच्या महत्त्वाकांक्षांना एक आधुनिक व एकात्मिक स्वरूप प्रदान करते. ही ओळख आमच्या प्रत्येक व्यवसायाला आपापले स्वतंत्र अस्तित्व जपून एका सामायिक ध्येयाशी अधिक सशक्तपणे जोडण्या

स सक्षम करते.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments