Thursday, August 20, 2026
Google search engine

पुणे -कोथरुड परिसरातील नागरिकांचे हाल वारजे, कर्वेनगर प्रभाग समिती अध्यक्षा सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावला आहे.त्यांनी सांगितले की

आज पाण्याअभावी आपल्या सर्वांचेच हाल होतं होते. मी सकाळी 6 वाजल्यापासून परिस्थिती वर लक्ष ठेऊन सर्वांशी संपर्कात होते.
आज सर्वसाधारण सभेत हा प्रश्न मांडण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र मोठी कार्यपत्रिका व अनेक विषय असल्यामुळे मा. महापौरांना मला बोलण्यासाठी वेळ देता आला नाही.
अखेर दुपारी 4 वाजता मी व संदीपजी खर्डेकर यांनी
“मा. ना. चंद्रकांतदादा पाटील”
यांच्याशी संपर्क करून त्यांना कोथरूडकरांच्या त्रासाची कल्पना दिली.
कार्यतत्पर
!! आमदार आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील !!
यांनी त्वरित महापालिका आयुक्त नवलकिशोर राम व पाणी पुरवठाविभागा चे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप
यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती चा आढावा घेतला.
मा. चंद्रकांतदादांच्या हस्तक्षेपानंतर व निर्देशांमुळे आता टप्प्या टप्प्याने कोथरूड चा पुरवठा सुरळीत होतं असून रात्री पर्यंत सर्वत्र पाणी पुरवठा होईल.
तसेच उद्या देखील नियमित पाणीपुरवठा होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments