Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्र सेविका समितीचा १ मे रोजी 'विजयघोष'* *समितीच्या ९० व्या वर्षानिमित्त पश्चिम...

राष्ट्र सेविका समितीचा १ मे रोजी ‘विजयघोष’* *समितीच्या ९० व्या वर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्रात ४ ठिकाणी एकाच वेळी सांघिक वादन*

पुणे, दिनांक २४ एप्रिल २०२६ : ‘राष्ट्र सेविका समिती’ स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या शारीरिक-घोष विभागामार्फत येत्या शुक्रवारी, १ मे २०२६ रोजी भव्य ‘विजयघोष-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे संपूर्ण प्रांतात एकाच दिवशी आणि एकाच वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणी ‘घोष प्रतियोगिता’ आणि ‘सांघिक वादन’ पार पडणार आहे.

विमाननगर येथील सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या वंदनीय प्रमुख संचालिका व्ही. शांताकुमारी यांचे शुभाशिर्वाद लाभणार आहे. तर गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंजली तापडिया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील.

प्रांतात चार ठिकाणी आयोजन
१ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता प्रांतात खालील ठिकाणी हे कार्यक्रम होतील:
१) पुणे (विमाननगर): सिम्बायोसिस महाविद्यालय मैदान, जुना कॅम्पस.
२) पुणे (टिळक रस्ता): न्यू इंग्लिश स्कूल येथे होणाऱ्या कार्यक्रमाला अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलका इनामदार आणि प्रसिद्ध संगीतकार सुयोग कुंडलकर उपस्थित राहतील.
३) कोल्हापूर: प्रायव्हेट हायस्कूल मैदान (खासबाग) येथील कार्यक्रमाला समितीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, प्रचारिका भाग्यश्री साठे आणि ज्येष्ठ तबलावादक राजप्रसाद धर्माधिकारी यांची उपस्थिती असेल.
४) अहिल्यानगर: रेणावीकर प्रशाला (सावेडी नाका) येथील कार्यक्रमाला अखिल भारतीय सह घोषप्रमुख प्राची पाटील आणि सुप्रसिद्ध गायिका अपूर्वा निषाद उपस्थित राहतील.

महिला शक्तीच्या शिस्तबद्ध संचलन आणि घोष वादनातून राष्ट्रभक्तीचा जागर करणाऱ्या या कार्यक्रमांना नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments