Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती हाताळण्यासाठी नियंत्रण व नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती हाताळण्यासाठी नियंत्रण व नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी, २६ एप्रिल २०२६ :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी तसेच अशी परिस्थिती हाताळण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उप आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून तर अतिरिक्त आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद मिळावा, यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

पावसामुळे शहरात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्तांचे रक्षण करणे आणि नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उपआयुक्त या पदावरील अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून व अतिरिक्त आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नोडल अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई यासारख्या कामकाजाची अंमलबजावणी विहित कालावधीत पूर्ण व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील पूरनियंत्रण आराखड्यानुसार आपत्ती व्यवस्थापन, स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन, वैद्यकीय व विद्युत विभागाशी समन्वय साधून पूरनियंत्रण व आपत्कालीन सेवा सुरळीतपणे पार पाडाव्यात, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय नियुक्त नियंत्रण अधिकारी व त्यांचे संपर्क क्रमांक :-

अतिरिक्त आयुक्त (१) – अ, ब,क क्षेत्रीय कार्यालय – ९२७१०५७१०१

अतिरिक्त आयुक्त (२) – ड, इ क्षेत्रीय कार्यालय – ९८९२९८६०९५

अतिरिक्त आयुक्त (३) – फ,ग,ह क्षेत्रीय कार्यालय – ८६००११२३१३

……

क्षेत्रीय कार्यालयानिहाय नियुक्त नोडल अधिकारी व त्यांचे संपर्क क्रमांक :-

उप आयुक्त ममता शिंदे – अ क्षेत्रीय कार्यालय – ८४५९५३१५२०

उप आयुक्त राजेश आगळे– ब क्षेत्रीय कार्यालय – ९५५२५११९७२

उप आयुक्त अण्णा बोदडे – क क्षेत्रीय कार्यालय – ९९२२५०१९४२

उप आयुक्त सिताराम बहुरे – ड क्षेत्रीय कार्यालय – ९९२३९८९७७४

उप आयुक्त पंकज पाटील– इ क्षेत्रीय कार्यालय – ८३८०८१७८०६

उप आयुक्त संदीप खोत – फ क्षेत्रीय कार्यालय – ७७२२०६०९२६

उप आयुक्त चेतना केरुरे – ग क्षेत्रीय कार्यालय – ९४२०४८४८३१

उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास – ह क्षेत्रीय कार्यालय – ७७४४०००६६८

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments