Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedजगातील सर्वांत मोठ्या इन्स्टंट पेय उत्पादक रसना तर्फे अभिनेत्री तमन्ना भाटिया यांची...

जगातील सर्वांत मोठ्या इन्स्टंट पेय उत्पादक रसना तर्फे अभिनेत्री तमन्ना भाटिया यांची ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी नियुक्ती

दरवर्षीप्रमाणे या उन्हाळ्यात रसनाची एक नवीन मोहिम सादर करण्यात आली आहे.जी केवळ आपल्याला उर्जा देणार्‍या 21 जीवनसत्त्वे आणि खनिजांवरच प्रकाश टाकत नाही तर प्रेम,आनंद,जोश आणि यश या जीवनसत्त्वांच्या भावनांवरही प्रकाश टाकते.सखोल बाजार संशोधन आणि लोकांमध्ये उत्पादनांच्या चवीची चाचणी (ब्लाइंड प्रॉडक्ट टेस्ट) च्या आधारावर रसना हे फळांच्या अर्कांसह जीवनसत्त्व,खनिज आणि ग्लुकोज पेय म्हणून नव्याने तयार केले गेले आहेे. नवीन जाहिरात मोहिम ही ग्राहकांच्या आणि त्यांच्या बदलत्या गरजा समजून घेण्यासाठी भारतभर केलेल्या व्यापक बाजार संशोधनाचा परिणाम आहे. हे नैसर्गिक,आरोग्यदायी आणि उत्तम चवींच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करते आणि उर्जा,जोश,आनंद आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विटॅमिन लव्ह प्रदान करण्यात उत्प्रेरक बनण्याबरोबरच एक चवदार,घट्ट आणि आरोग्यदायी पेय म्हणून पुर्नस्थित करते.

आज रसना हे केवळ जगप्रसिद्ध नावीन्यपूर्ण रसना सॉफ्ट ड्रिंक कॉन्सन्ट्रेट नाही तर रसना इन्स्टंट पावडर देखील आहे, जे अनेक प्रकारामध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये ७५० ग्रॅम पाउचमध्ये 33 ग्लासेस, ५०० ग्रॅम मध्ये 22 ग्लासेस,४०० ग्रॅम मध्ये 17 ग्लासेस बनवते, एक सॅशे मध्ये १ ग्लास इत्यादींचा समावेश आहे. नवीन पिढीला आवडणारे स्क्वॅश आणि सिरप सारखे लिक्विड कॉन्सन्ट्रेट विकसित करण्यासाठी रसनाने पुढाकार घेतला आहे. रसनाकडे आपल्या सब-ब्रँड रसना हेल्दी डे अंतर्गत संपूर्ण वेलनेस श्रेणी देखील आहे ज्यामध्ये शुद्ध मध, प्रथिने पावडर, मध/माल्ट-आधारित पावडर, चॉकलेट स्प्रेड्स, इंस्टंट सूप इत्यादींचा समावेश आहे.

या वर्षीच्या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणांचे आकर्षण असलेल्या तमन्ना भाटिया यांचा समावेश आहे. खरं तर, तमन्ना ही लहानपणापासूनच रसनाची चाहती आहे आणि रसनाचा आनंद घेत आहे, आणि वास्तविक जीवनात लव्ह यू रसना म्हणणारी एक लहान मुलगी म्हणून त्यांना स्वतःची एक वेगळी आठवण आहे आणि म्हणूनच त्यांचे रसना सोबत जोडले जाणे असणे हे स्वाभाविक होते. खरं तर, जाहिरातीमध्ये त्यांनी रसना ही आनंद देणारी, यश देणारी आणि कुटुंबातील प्रेमावर प्रकाश टाकणाऱ्या भावनिक स्थितीला समोर आणले आहे. तमन्नाच्या कुशल व विश्वासार्ह अभिनयाशिवाय जाहिरातीची ही भावनिक जादू घडू शकली नसती, हे फक्त जाहिरात पाहिल्यावरच कळेल.

याप्रसंगी रसनाच्या नवीन ब्रँड मोहिमेच्या अनावरणाबाबत बोलताना रसना समूहाचे समूह अध्यक्ष पिरुझ खंबाट्टा म्हणाले की, तमन्ना भाटिया सारख्या सेलिब्रिटीला देखील रसना त्यांच्या बालपणापासून आवडते आणि रसनाचे समर्थन करण्यास त्या अत्यंत उत्सुक होत्या याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आज रसना ही केवळ सेलिब्रिटींसारख्या पिढ्यांच्या प्रेमासाठीच नाही तर सामान्य व्यक्तींच्या प्रेमासाठीही उभी आहे, आम्हाला अभिमान आहे की केवळ श्रीमंतच नाही, तर भारतात राहणाऱ्या सामान्य आणि ग्रामीण भागातील लोकांनी देखील रसनाचा आस्वाद घेतला आहे. म्हणूनच रसना आज रु.1/- प्रति ग्लास ते रु.10/- पर्यंत प्रति ग्लास च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या पंतप्रधानांच्या स्वप्नांशी सुसंगत राहत रसना पुरवठा साखळीत विशेषतः ग्रामीण भागात थेट प्रवेश करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे दुप्पट मूल्य मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे याचाही आम्हाला अभिमान वाटतो. रसना हा एक अभिमानास्पद मेक इन इंडिया ब्रँड आहे जो केवळ स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या उत्पादनांसह बनविला जातो, या क्षेत्रातील स्पर्धकांकडून फळे आणि घटक आयात केले जात असताना फक्त भारतीय फळे आणि कच्चा माल वापरणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी रसना ही एक आहे. ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेली नैसर्गिक उत्पादने उत्तम दर्जाची, मूल्यवर्धित उत्पादने विकसित करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.

या भागीदारीबद्दल बोलताना तमन्ना भाटिया म्हणाल्या की, ब्रँड आणि वारसा असलेलं रसना हे भारताच्या हृदयात असलेले एक उत्कृष्ट उदाहरण आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित बेव्हरेज ब्रँड सोबत जोडले गेल्याचा मला अभिमान आहे. रसनाने पूर्णपणे जीवनसत्त्वे, खनिजे आणि ग्लुकोज असलेले हेल्थ ड्रिंक म्हणून तयार करण्यात आले आहे,यामुळे लाखो लोकांना पोषक उत्पादन मिळणार आहे म्हणूनच या मोहिमेचा भाग होण्यासाठी मी अधिक उत्साहित आहे. हे प्रत्येक लहान मुलाचे पहिले प्रेम आहे आणि माझ्या मनातील पहिली पसंती आहे, मी इतका मजबूत भावनिक संबंध असलेला दुसरा कोणताच एफएमसीजी ब्रँड कधीच पाहिला नाही. हे देशाचे राष्ट्रीय पेय असल्यासारखे आहे.

रसना ने बाजारपेठेतील या प्रकारात 85% मार्केट शेअरचा हिस्सा काबीज केला असून रसनाला 100% ब्रँड रिकॉल आहे. हा जगातील सर्वात मोठा सॉफ्टड्रिंक उत्पादक असून 12 अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पांसह भारतातील 1.6 दशलक्ष रिटेल आउटलेटमध्ये उपलब्ध आहे आणि जागतिक स्तरावर 60 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. रसनाच्या माध्यमातून जगासाठी मेक इन इंडिया स्वप्न साकार होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments