पुणे, 3 मे २०२६ :
किशोर पंप्सचे अध्यक्ष श्री. किशोर देसाई यांनी ‘किशोर देसाई फाउंडेशन’च्या माध्यमातून फलटण परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी ॲम्ब्युलन्स दान केली. या ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण पुण्यात प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुहृद सरदेसाई यांच्या हस्ते पार पडले. यावेळी किशोर देसाई, भाग्यश्री देसाई, सिद्धार्थ देसाई आणि अमृता देसाई उपस्थित होते.
किशोर देसाई फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व शुद्धीकरण तसेच सौरऊर्जा या क्षेत्रांत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना डॉ. सरदेसाई म्हणाले, “आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत प्रत्येक क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो. फलटणसारख्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही ॲम्ब्युलन्स अत्यंत उपयुक्त ठरेल, असा आमचा विश्वास आहे.” ही ॲम्ब्युलन्स आपत्कालीन परिस्थितीत फलटणच्या २५० किमी परिसरात कार्यरत राहणार आ
हे.


