Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorized‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’च्या तिसऱ्या हंगामासाठी २१ देशांतील १४६ रायडर्सची नोंदणी

‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’च्या तिसऱ्या हंगामासाठी २१ देशांतील १४६ रायडर्सची नोंदणी

नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘२५० सीसी – ग्रुप ‘ए’ फॉरेन बाइक्स ओन्ली – इंडियन फ्युचर्स’ गटामुळे भारतीय रायडर्सना आपली क्षमता दाखवण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत प्रतिभेला अधिक संधी.

एएमए, एफआयएम आणि इतर आघाडीच्या स्पर्धांतील विजेत्या रायडर्सचा मोठ्या प्रमाणावर सहभाग, तसेच सरकारकडून मिळणारे अतिरिक्त पाठबळ, यांमुळे भारताची जागतिक सुपरक्रॉस क्षेत्रातील एक महत्त्वाचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू.

पुणे, ७ ऑक्टोबर २०२६ : जगातील पहिली फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस स्पर्धा असलेल्या ‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’ने (आयएसआरएल) आपल्या तिसऱ्या हंगामासाठी खेळाडूंच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या हंगामात २१ देशांतील १४६ खेळाडूंची लीगच्या चार रेसिंग गटांमध्ये नोंदणी झाली. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित स्पर्धकांसह भारतातील आघाडीचे ‘सुपरक्रॉस रायडर्स’ही सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेची गुणवत्ता अधिक उंचावण्यास मदत होणार असून, भारतातील सुपरक्रॉस क्रीडेच्या विकासालाही चालना मिळणार आहे. यंदा नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘२५० सीसी – ग्रुप ‘ए’ फॉरेन बाइक्स ओन्ली – इंडियन फ्युचर्स’ गटासह ‘२५० सीसी इंडिया-एशिया मिक्स’ गटामध्ये भारतातून ३० नोंदणी झाल्या आहेत.

फ्रान्समधून सर्वाधिक ३२ खेळाडूंनी नोंदणी केली असून, त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियातून २० आणि अमेरिकेतून १८ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. याशिवाय इंडोनेशिया, थायलंड, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, इटली, जपान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, झेक प्रजासत्ताक, स्वीडन, झिम्बाब्वे, श्रीलंका आणि मंगोलिया येथील खेळाडूही स्पर्धेत सहभागी होणार आहेत. नोंदणी झालेल्या खेळाडूंमध्ये ‘४५० सीसी इंटरनॅशनल’ गटात ४०, ‘२५० सीसी इंटरनॅशनल’ गटात ५४ आणि ‘२५० सीसी इंडिया-एशिया मिक्स’ गटात २६ खेळाडूंचा समावेश आहे. या नोंदणींमुळे यंदाची स्पर्धा अधिक वैविध्यपूर्ण आणि चुरशीची होणार असल्याचे दिसून येते.

तिसऱ्या हंगामातील खेळाडूंच्या यादीत या क्रीडा प्रकारातील अनेक नामांकित रायडर्सचा समावेश आहे. ‘४५० सीसी इंटरनॅशनल’ गटात दुसऱ्या हंगामाचा विजेता मॅट मॉस याच्यासह जॉर्डी टिक्सिएर, जॉन शॉर्ट, अँथनी बॉर्डन, ग्रेगरी अरांडा, रायन ब्रीस, ल्यूक क्लाउट आणि अँथनी रॉड्रिग्झ यांचा समावेश आहे; तर ‘२५० सीसी इंटरनॅशनल’ गटात रीड टेलर, कॅल्विन फोनव्हिएल, जस्टिन रोडबेल आणि निको कोच हे रायडर्स सहभागी होणार आहेत. ‘२५० सीसी इंडिया-एशिया मिक्स’ गटात वित्सारुत सलंगाम, थानारत पेनजान, अथिसोन रुआद्रेओ, नकामी विदी मकारिम, बेन हॉलग्रेन आणि मुहम्मद अथार अलघिफारी यांसारखे खेळाडू सहभागी होत असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेला आणखी रंगत येणार आहे.

भारताचे प्रतिनिधित्व देशातील काही आघाडीचे सुपरक्रॉस रायडर्स करणार आहेत. त्यामध्ये ऋग्वेद बारगुजे, प्रज्वल विश्वनाथ, श्लोक घोरपडे आणि इक्षण शानभाग यांचा समावेश आहे. जगभरातील विविध देशांतील नामांकित रायडर्ससोबत हे भारतीय खेळाडूही स्पर्धेत उतरणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना चुरशीच्या शर्यती पाहायला मिळणार आहेत. तसेच भारतीय खेळाडूंना आपल्या देशातच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रायडर्सविरुद्ध स्पर्धा करण्याची आणखी एक महत्त्वाची संधी मिळणार आहे.

रायडर्सची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’चे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, “यंदाच्या नोंदणीचे महत्त्व केवळ सहभागी झालेल्या रायडर्सच्या किंवा देशांच्या संख्येपुरते मर्यादित नाही. सुपरक्रॉसमध्ये आघाडीवर असलेल्या देशांतील नामांकित रायडर्स सातत्याने भारतात स्पर्धा करण्यासाठी येत आहेत. यावरून आपल्या स्पर्धेच्या दर्जाबाबत आणि या क्रीडा क्षेत्राच्या वाढीबाबत त्यांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येते. तसेच इंडियन फ्युचर्स हा गट भारतीय रायडर्ससाठी नियोजनबद्ध प्रगतीचा मार्ग तयार करण्याच्या आमच्या उद्दिष्टाचा महत्त्वाचा भाग आहे. या गटालाही उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे. लीगचा विस्तार होत असताना जागतिक दर्जाचे खेळाडूंना आकर्षित करणारी आणि भारतीय रायडर्सना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी देणारी व्यावसायिक क्रीडा व्यवस्था उभी करण्यावर आमचा भर कायम राहणार आहे.”

‘आयएसआरएल’च्या दुसऱ्या हंगामाचा विजेता मॅट मॉस म्हणाला, “सलग दोन वेळा ‘आयएसआरएल’चे विजेतेपद मिळवणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहे. प्रत्येक हंगामागणिक या स्पर्धेचा दर्जा उंचावत आहे. स्पर्धा अधिक चुरशीची होत आहे आणि यातील प्रत्येक यशासाठी कठोर मेहनत घ्यावी लागत आहे. भारतातील चाहत्यांनी सुपरक्रॉसला भरभरून प्रतिसाद दिला आहे. ते निर्माण करत असलेले वातावरण प्रत्येक रायडरला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरित करते. दोन यशस्वी हंगामांनंतरही माझी स्पर्धा जिंकण्याची जिद्द कायम आहे. तिसऱ्या हंगामात आणखी एक विजेतेपद मिळवण्यावर माझे पूर्ण लक्ष आहे.”

आता रायडर्सची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने लीगचे लक्ष रायडर्सच्या आगामी लिलावाकडे वळले आहे. या लिलावामध्ये फ्रँचायझी संघ तिसऱ्या हंगामासाठी नोंदणी झालेल्या अंतिम खेळाडूंच्या यादीतून आपापले संघ निवडतील. लीगच्या वेळापत्रकातील हा पुढील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यामधून प्रत्येक संघाची रचना निश्चित होईल आणि आगामी हंगामातील स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट होईल. पहिल्या फेरीच्या तयारीलाही यानंतर अधिक वेग मिळणा

र आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments