Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedएशियन पेंट्सद्वारा सादर त्यांची नवीन कॉर्पोरेट मोहीम- ‘रंगांची वॉरंटी’, जी रंग घरांची...

एशियन पेंट्सद्वारा सादर त्यांची नवीन कॉर्पोरेट मोहीम- ‘रंगांची वॉरंटी’, जी रंग घरांची ओळख कसे बनतात हे अधोरेखित करते.

एशियन पेंट्सची वॉरंटी, त्यांची दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरीचे आणि विश्वासाचे प्रतीक ही प्रतिमा अधिक दृढ करते.

 

भारतात, पत्ते आणि दिशा म्हणजे केवळ रस्त्यांची नावे किंवा पिन कोडच नाहीत. तर ते अनेकदा ‘निळ्या घरा नंतर डावीकडे वळा’ किंवा ‘ते लाल घर जिथे प्रत्येक सणासुदीला पाहुणे येतात’ अशा आठवणींना उजाळा देतात. ज्या देशात रंग सर्वत्र सर्वव्यापी आहे, तिथे घरे म्हणजे केवळ रंगवलेल्या भिंती नाहीत, तर ती सुपरिचित चिन्हे बनतात, ज्यांना लोक ओळखतात आणि त्यांच्याशी नाते जोडतात.

 

‘रंग म्हणजेच खरा पत्ता’ या कल्पनेच्या आधारे, एशियन पेंट्स आपली नवीन मोहीम ‘रंगांची वॉरंटी’ सादर करत आहेत, जी गेल्या वर्षी ‘एशियन पेंट्सची वॉरंटी असे भारतातील प्रत्येक दुसरे घर सांगते’ या मोहिमेद्वारे सुरू केलेला संवाद पुढे नेते.

 

एका उबदार, भावनिक गाण्यावर आधारित हा चित्रपट, एशियन पेंट्सने रंगवलेली भारतीय घरे दैनंदिन जीवनाचा आणि आठवणींचा भाग कशी बनतात हे दाखवतो. आयुष्य बदलले तरी, हे रंग कसे तसेच राहतात; ते केवळ रंग न राहता, लोकांच्या ओळखीच्या परिचित जागा बनतात; साध्या, सहज जुळणाऱ्या क्षणांच्या माध्यमातून हा चित्रपट यावर जोर देतो. हा चित्रपट एशियन पेंट्सचे दीर्घकाळ टिकणारे रंग केवळ भिंतींवरच राहत नाहीत, तर ते लोकांच्या मनातही घर करतात आणि कालांतराने घरांची खरी ओळख बनतात, ही जाणिव दृढ करतो.

 

ही मोहीम एशियन पेंट्ससाठी ‘वॉरंटी’चा अर्थ काय आहे, हे प्रतिबिंबित करते. ही मोहीम केवळ दीर्घकाळ टिकणाऱ्या रंगाबद्दल नाही, तर भिंतींच्या सभोवताली निर्माण झालेल्या आठवणी आणि जिव्हाळ्याचे रक्षण करण्याच्या वचनाबद्दल देखील आहे.

 

आठ दशकांहून अधिक काळ, एशियन पेंट्स भारतातील लहान शहरांपासून ते मोठ्या महानगरांपर्यंत, घरांचा आणि हृदयांचा एक हिस्सा बनले आहेत. गेल्या वर्षीच्या मोहिमेने विश्वासाचा हा वारसा सजीव केला आणि देशभरातील लोक एशियन पेंट्सवर कसे अवलंबून असतात हे दाखवून दिले.

 

गेल्या वर्षभरात, ‘दशकांचा विश्वास’ (Decades of Trust) सारख्या छापील जाहिरातींपासून ते एशिया कप दरम्यान ‘वॉरंटी काउंटडाउन’ सारख्या सांस्कृतिक क्षणांपर्यंत, अनेक उपक्रमांद्वारे हा संदेश अधिक दृढ करण्यात आला. ‘रंगांची वॉरंटी’ ही रंगांच्या माध्यमातून पाहिली जाणारी अशीच एक नैसर्गिक उत्क्रांती आहे, — हे एक असे अवकाश आहे, जे भारतीयांशी असलेल्या खोल भावनिक नात्यातून ब्रँडने आपलेसे केले आहे. या मोहिमेबद्दल बोलताना, एशियन पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अमित सिंगल म्हणाले,

 

“आठ दशकांहून अधिक काळ, एशियन पेंट्सने भारतीय घरांत रंगत आणली आहे – पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ती त्यांच्या ओळखीचा एक भाग बनली आहे. आमचा विश्वास आहे की, आमच्या वॉरंटीचे वचन अशा भिंतींवर प्रतिबिंबित होते, ज्या केवळ भक्कमपणे उभ्या राहत नाहीत, तर चैतन्यमय राहतात – उबदारपणा, एकमेकांशी वाटून घेतलेल्या प्रथा आणि काळासोबत अधिक मौल्यवान होणाऱ्या आठवणी जपतात. रंग दीर्घकाळ टिकतो तेव्हा तो घराच्या पत्त्याशी जोडलेली एक आठवण बनतो – त्वरित ओळखता येणारी आणि मनाला खोलवर भिडणारी. ‘रंगांची वॉरंटी’ हे याच चिरंतन नात्याला केलेले एक अभिवादन आहे, जिथे रंग केवळ पृष्ठभाग सजवत नाही, तर तो घराच्या वारसा आणि अभिमानाचे एक चिरस्थायी प्रतीक बनण्यासाठी दीर्घ काळअबाधित राहतो. आमच्यासाठी, वॉरंटी ही केवळ उत्पादनाची हमी नाही; तर ती विश्वासावर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरीवरील अढळ आत्मविश्वासावर आधारित एक वचनबद्धता आहे. म्हणूनच “एशियन पेंट्सच्या रंगांची वॉरंटी” हे “भारताच्या प्रत्येक दुसर्‍या घराचा पत्ता” बनले आहे – दीर्घकाळ टिकून राहणारी घरे व रंग आणि पुढे चालू राहणाऱ्या कथा यांचे एक शांत पण शक्तिशाली प्रतीक.”

 

इंडियन प्रीमियर लीग दरम्यान लॉंच झालेल्या या मोहीमेचे एशियन पेंट्स हे टेलिव्हिजनवर सहकारी प्रसारण प्रायोजक आहेत आणि म्हणून ही एक नैसर्गिक सांस्कृतिक मिलाप साधते. भारतात भावना आणि अस्मिता क्रिकेटशी खोलवर जुळलेल्या आहेत. तसेच, हा रंग म्हणजे टीमचे रंग, शहराचा अभिमान आणि एकत्र घालवलेले क्षण साजरे करण्याचा उत्सव सुध्दा आहे. एशियन पेंट्स हा संदर्भ असिमीतपणे प्रकारे एकत्रित करतात, ज्या रंगांना आपण पाठिंबा देतो त्यांना आपल्या जीवनाच्या रंगांशी जोडतात, ज्यामुळे ही कथा सहज आणि अत्यंत सुपरि

चित वाटते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments