Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized32व्या वरिष्ठ राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण विजेतेपद 

32व्या वरिष्ठ राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण विजेतेपद 

 

 

पुणे, 6 मे 2026: पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 32 व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने 119 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले. तर,

 

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत गुजरात संघाने 36 गुणांसह दुसरा आणि दिल्ली संघाने 27 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.

 

50 वर्षांवरील महिला गटात अंतिम लढतीत गुजरातच्या प्रसुन्ना पारीखने महाराष्ट्राच्या मुनमुन मुखर्जीचा 08-11, 11-08, 11-05, 11-09 असा तर, पुरुष गटात महाराष्ट्राच्या किरण सॅलियनने हिमाचल प्रदेशच्या मनीष नेपाळीचा 11-06, 11-09, 11-04 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

 

55 वर्षांवरील महिला गटात अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या शिल्पा जोशीने तृप्ती माचवेचा 11-04, 11-08, 11-01 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पुरुष गटात दिल्लीच्या हर्ष चोप्राने महाराष्ट्राच्या रवींद्र जोशीचा 09-11, 11-05, 11-03, 11-08 असा पराभव करून विजेतेपदाचा मान मिळवला.

 

दुहेरीत 50 वर्षांवरील मिश्र दुहेरीत महाराष्ट्राच्या मनीष रावतने मुनमुन मुखर्जीच्या साथीत गुजरातच्या प्रसुन्ना पारीख व मिहिर व्यास यांचा 11-09, 11-08, 11-09 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 55 वर्षांवरील मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अनघा जोशी व प्रसाद नाईक या जोडीने गुजरातच्या शगुन सुतारिया व नेहा पटेल यांचा 07-11, 11-06, 07-11, 11-09, 11-04 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

 

स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या खेळाडूंना करंडक व पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय टेबल टेनिस संघटनेच्या प्रौढ विभागाचे प्रमुख केके महेश्वरी, एमएसटीटीएचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहिर केळकर, क्लबचे वित्तीय विभागाचे सचिव गिरीश इनामदार,

ज्युदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक, एमएसटीटीएचे जनरल सेक्रेटरी यतीन टिपणीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस,पीडीटीटीएचे उपाध्यक्ष प्रकाश तुळपुळे, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष राजीव बोडस, संजय कडू, सुभाष देसाई, राकेश जैन, श्रुती जोशी, श्रीराम कोनकर, स्पर्धा संयोजन सचिव आशिष बोडस आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

निकाल: एकेरी: 50 वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:

प्रसुन्ना पारीख(गुजरात) वि.वि.निता वैष्णव(मध्यप्रदेश)12-10, 11-07, 11-08;

मुनमुन मुखर्जी(महाराष्ट्र)वि.वि.सोनल जोशी(गुजरात)03-11, 11-09, 11-09, 11-05;

अंतिम फेरी: प्रसुन्ना पारीख(गुजरात) वि.वि.मुनमुन मुखर्जी(महाराष्ट्र)08-11, 11-08, 11-05, 11-09;

 

50 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:

मनीष नेपाळी(हिमाचल प्रदेश) वि.वि.मुकुल बोरो(आरबीआय) 05-11, 11-08, 13-11, 11-09;

किरण सॅलियन(महाराष्ट्र)वि.वि.सिकंदर जैन 11-09, 11-07, 10-12, 11-09;

अंतिम फेरी: किरण सॅलियन(महाराष्ट्र)वि.वि.मनीष नेपाळी(हिमाचल प्रदेश) 11-06, 11-09, 11-04;

 

55 वर्षांवरील महिला: उपांत्य फेरी:

तृप्ती माचवे(महाराष्ट्र) वि.वि.दिव्या पांड्या(गुजरात)11-08, 12-10, 05-11, 11-09;

शिल्पा जोशी(महाराष्ट्र) वि.वि.नेहा पटेल(गुजरात)11-08, 11-04, 20-18;

अंतिम फेरी: शिल्पा जोशी(महाराष्ट्र) वि.वि.तृप्ती माचवे(महाराष्ट्र) 11-04, 11-08, 11-01;

 

55 वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:

रवींद्र जोशी(महाराष्ट्र) वि.वि.दिपक गोपानी(गोवा)13-11, 10-12, 13-11, 11-05;

हर्ष चोप्रा(दिल्ली) वि.वि.नितीन टोशनीवाल(महाराष्ट्र)06-11, 11-07, 11-04, 11-05;

अंतिम फेरी: हर्ष चोप्रा(दिल्ली) वि.वि.रवींद्र जोशी(महाराष्ट्र)09-11, 11-05, 11-03, 11-08;

 

 

दुहेरी गट:

50 वर्षांवरील महिला दुहेरी: उपांत्य फेरी:

निता वैष्णव/अर्चना राठोड(मध्यप्रदेश) वि.वि.ममता जयराम/शितल घोडके(कर्नाटक)07-11, 12-10, 08-11, 11-07, 11-09;

सोनल जोशी/प्रसुन्ना पारीख(गुजरात) वि.वि.श्रावणी धापरे/शिवप्रिया नाईक(महाराष्ट्र) 11-05, 11-03, 11-08;

अंतिम फेरी: सोनल जोशी/प्रसुन्ना पारीख(गुजरात) वि.वि.निता वैष्णव/अर्चना राठोड(मध्यप्रदेश) 11-04, 11-08, 11-05;

 

50 वर्षांवरील पुरुष दुहेरी: उपांत्य फेरी:

मुकुल बोरो/जगत सिंग बिश्त(आरबीआय)वि.वि.गौरव दोशी/सिकंदर जाम(आयए अँड एडी)13-11, 11-07, 05-11, 11-09;

समीर भाटे/किरण सॅलियन(महाराष्ट्र)वि.वि.मनीष रावत/तेजस नाईक(महाराष्ट्र)11-02, 06-11, 11-06, 12-10;

अंतिम फेरी: मुकुल बोरो/जगत सिंग बिश्त(आरबीआय)वि.वि.समीर भाटे/किरण सॅलियन(महाराष्ट्र)11-07, 11-04, 11-06;

 

50 वर्षांवरील मिश्र दुहेरी: उपांत्य फेरी:

प्रसुन्ना पारीख(गुजरात)/मिहिर व्यास(गुजरात)वि.वि.सोनल जोशी/हिरल मेहता(गुजरात)12-14, 10-12, 11-07, 11-04, 11-04;

मनीष रावत/मुनमुन मुखर्जी(महाराष्ट्र)वि.वि.संदीप कादंबी/अनमोना बरुआ(कर्नाटक) 11-04, 11-08, 11-02;

अंतिम फेरी: मनीष रावत/मुनमुन मुखर्जी(महाराष्ट्र)वि.वि.प्रसुन्ना पारीख(गुजरात)/मिहिर व्यास(गुजरात)11-09, 11-08, 11-09;

 

 

55 वर्षांवरील महिला दुहेरी: उपांत्य फेरी:

स्नेहा पाध्ये/तृप्ती माचवे(महाराष्ट्र) वि.वि.आभा पांडे/राधा तिवारी 09-11, 11-07, 11-04, 11-05;

अनघा जोशी/शिल्पा जोशी(महाराष्ट्र) वि.वि.सुनिता धटिंगण/वैशाली मालवणकर(महाराष्ट्र)11-08, 11-09, 11-05;

अंतिम फेरी: अनघा जोशी/शिल्पा जोशी(महाराष्ट्र) वि.वि.स्नेहा पाध्ये/तृप्ती माचवे(महाराष्ट्र) 11-03, 11-02, 11-04;

 

 

55 वर्षांवरील मिश्र दुहेरी: उपांत्य फेरी:

अनघा जोशी/प्रसाद नाईक(महाराष्ट्र)वि.वि.साधना नेहलानी/किशोर मोटवानी(मध्यप्रदेश)03-11, 11-08, 10-12, 11-09, 14-12;

अंतिम फेरी: अनघा जोशी/प्रसाद नाईक(महाराष्ट्र)वि.वि.शगुन सुतारिया/नेहा पटेल(गुजरात)07-11, 11-06, 07-11, 11-09, 11-04;

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments