Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorized▪️रा.स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेतील प्रदर्शनाचे उद्घाटन▪️

▪️रा.स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेतील प्रदर्शनाचे उद्घाटन▪️

नागपूर, १४ मार्च
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे उद्घाटन 15 मार्च रोजी स्मृतिभवन रेशीमबाग, नागपूर (महाराष्ट्र) येथे होणार आहे. यानिमित्ताने प्रतिनिधी सभेच्या महर्षी दयानंद सरस्वती सभागृहात आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, १४ मार्च रोजी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांच्या हस्ते झाले. यावेळी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील जी आंबेकर आणि सह-प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार जी आणि आलोक कुमार जी देखील उपस्थित होते. या प्रदर्शनात भारतीय संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या प्रतिकृती, माजी प्रचारकांच्या चरित्रांचे परिचय फलक, डायग्नॉस्टिक सेंटर, सेवा विभाग आणि लोककल्याण समितीच्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे. पर्यावरण, समरसता, महाविद्यालयीन आयाम, आत्मनिर्भर भारत अभियान आणि विविध सेवा संस्थांचे उपक्रम यावरही प्रदर्शनाद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments