Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक पेडिअट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (PICU) जनजागृती आठवडा २०२६* ...

जागतिक पेडिअट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (PICU) जनजागृती आठवडा २०२६* *चिमुकल्या बालरुग्णांच्या जिद्दीला सलाम; अंकुरा हॉस्पिटलचा विशेष उपक्रम*

गंभीर आजारातून बरे झालेल्या मुलांचा केला सत्कार

 

*पुणे :* जागतिक पेडिअट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (PICU) जनजागृती आठवड्या निमित्त अंकुरा हॉस्पीटल फॅार वुमन ॲण्ड चिल्ड्रन, पुणे यांच्या वतीने *“देखभाल करणाऱ्यांची देखभाल घेणे”*(Caring for Caregivers) या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये गंभीर आजारांवर मात करून पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (PICU) मधून यशस्वीरीत्या उपचार करण्यात आलेल्या बालरुग्णांचा व PICU मधे बालरुग्णांची देखभाल करणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या उपचारप्रक्रियेदरम्यान त्यांची साथ देणाऱ्या पालक, कुटुंबीय आणि डॅाक्टरांच्या समर्पणालाही मानाचा मुजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमात पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटमधून बरे झालेल्या मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या चिमुकल्या लढवय्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले . या उपक्रमामुळे मुलांसह पालकांनाही भावनिक आधार मिळाला.

 

पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (PICU) हे मुलांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि सातत्यपूर्ण देखरेखीची सुविधा असलेले विशेष विभाग आहे. गंभीर संसर्ग, श्वसनासंबंधी त्रास, अपघात, न्यूरोलॉजिकल आपत्कालीन स्थिती, शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंती, अवयव निकामी होणे किंवा इतर जीवघेण्या आजारांनी ग्रस्त मुलांवर याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून २४ तास उपचार केले जातात.

 

जागतिक पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट जनजागृती सप्ताहाचा उद्देश हा बालरुग्णांच्या अतिदक्षता उपचारांविषयी जनजागृती करणे तसेच गंभीर परिस्थितीत मुलांनी, पालकांनी आणि आरोग्यसेवकांनी दाखवलेल्या मानसिक व शारीरिक ताकदीचा गौरव करणे हा आहे. या उपक्रमातून वेळीच निदान, अत्याधुनिक अतिदक्षता सेवा आणि कुटुंबकेंद्रित आधारव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

 

*अंकुरा हॉस्पिटलमधील पीआयसीयू (PICU) आणि बालरोग आपत्कालीन सेवा विभागाचे प्रमुख आणि जिनिव्हा येथील डब्ल्यूएफपीआयसीसीएस (WFPICCS) शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जंबगी म्हणाले,* पीआयसीयू मध्ये दाखल होणारे बहुतांश मुले गंभीर असून जीवन- मृत्यूशी लढा देत असतात आणि त्या प्रत्येक मुलामागे त्यांच्या भविष्याबाबत भीती, आशा आणि भावनिक ताण सहन करणारे कुटुंबिय खंबीरपणे उभे असते. जागतिक पीआयसीयू जनजागृती सप्ताह हा केवळ वैद्यकीय सेवेचा गौरव नसून पालक, कुटुंबिय, परिचारिका आणि डॉक्टर यांच्या ताकदीचाही सन्मान आहे. या कार्यक्रमातून या कुटुंबांना तुम्ही एकटे नाहीत हा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर आजारातून बरे होऊन मुलांना पुन्हा हसताना पाहणे, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे.

 

या कार्यक्रमाद्वारे बालरुग्णांच्या अतिदक्षता उपचारांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याबरोबरच कठीण वैद्यकीय परिस्थितीतून गेलेल्या कुटुंबांना भावनिक बळ देण्याचा प्रयत्न क

रण्यात आला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments