पुणे ११ मे २०२६: भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या १ दशलक्ष टाटा नेक्सॉनचा टप्पा गाठल्याचा आनंद साजरा करताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स (टीएमपीव्ही) या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आज नेक्सॉन प्युअर+ पीएसच्या लाँचची घोषणा केली. या कारची किंमत ९.५९ लाख रूपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते.
या कामगिरीनंतर टाटा नेक्सॉन १० लाख रूपयांच्या आत पॅनोरामिक सनरूफ देणारी भारतातील एकमेव कार बनली आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या पसंतीचे हे प्रगत वैशिष्ट्य आता अधिकाधिक ग्राहकांच्या आवाक्यात आले आहे. कंपनीच्या मल्टी पॉवरट्रेन धोरणाला पुढे नेत नेक्सॉन प्युअर+ पीएस ही भारतातील सर्वाधिक इंधन-क्षम डिझेल इंजिन (एमटी व एएमटी) आणि पेट्रोल (एमटी व एएमटी), तसेच ट्विन सिलेंडर आयसीएनजी (एमटी)मध्ये या सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली १.२-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनसह उपलब्ध असेल.
या लाँचप्रसंगी मत व्यक्त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आणि आर्थिक वर्ष २०२६ मधील भारतातील नंबर १ एसयूव्ही म्हणून नेक्सॉन ही देशभरातील ग्राहकांची पहिली पसंती राहिली आहे. ११० लाख रूपयांच्या आत भारतातील पहिले पॅनोरामिक सनरूफ असलेल्या प्युअर+ पीएस व्हेरिएण्टच्या सादरीकरणामुळे याचे मूल्य अधिक वाढले आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा चारही प्रकारच्या पॉवरट्रेन देणारी भारतातील एकमेव एसयूव्ही म्हणून नेक्सॉन ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करत राहील, तसेच कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपले अपील अधिक प्रबळ करेल.”
सर्वोत्तम वैशिष्ट्ये असलेल्या नेक्सॉन प्युअर+ पीएस बद्दल माहिती
नेक्सॉन ही तिच्या विशिष्ट कूप-सारख्या डिझाइनमुळे, उत्कृष्ट सुरक्षा मानांकनांमुळे आणि एक परिपूर्ण पॅकेज असल्यामुळे भारतातील सर्वात आवडती एसयूव्ही राहिली आहे. नेक्सॉन प्युअर+ पीएस आता या लोकप्रियतेला एका नवीन उंचीवर घेऊन जात आहे. आरामदायीपणा, तंत्रज्ञान आणि ग्राहकांची पसंती यांचा सुरेख संगम साधून ही कार दैनंदिन ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुखद करण्यासाठी एक अत्यंत फायदेशीर आणि आकर्षक पर्याय ठरते.
सर्वोत्तम वैशिष्ट्ये,
• अधिक प्रीमियम, ओपन-केबिन अनुभवासाठी भारतातील पहिले वॉईस-असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ (१० लाख रूपयांपेक्षा कमी किमतीत)
• २६.०३ सेमी हार्मन इन्फोटेन्मेंट सिस्टमसह वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅप्पल कारप्ले
• सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी ६-स्पीकर साऊंड सिस्टम
• अतिरिक्त सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन व सेन्सर्ससह एचडी रिअर-व्ह्यू कॅमेरा
• अधिक दृश्यमानतेसाठी ऑटो एलईडी हेडलॅम्प्स
• बदलत्या हवामान स्थितींमध्ये सोयीसुविधेसाठी रेन-सेन्सिंग फ्रण्ट व रिअर वायपर्स
• लांबच्या प्रवासादरम्यान सुरक्षित प्रवासासाठी क्रूझ कंट्रोल
• आधुनिक, वैशिष्ट्यपूर्ण रिअर प्रोफाइलसाठी एलईडी टेल लॅम्प्स
• सुलभता व व्यावहारिकतेसाठी ऑटो फोल्डसह इलेक्ट्रिक ओआरव्हीएम
व्हेरिएण्टनुसार किंमत
व्हेरिएण्ट ईएसपी रूपयांमध्ये (एक्स-शोरूम, दिल्ली)
पेट्रोल एमटी ९.५९ लाख
पेट्रोल एएमटी १०.१४ लाख
ट्विन सिलिंडर आयसीएनजी एमटी १०.३९ लाख
डिझेल एमटी १०.५४ लाख
डिझेल एएमटी ११.१९ लाख


