नवीन गॅलेक्सी टॅब एस१२ सिरीजमध्ये आकर्षक डिझाइन, शक्तिशाली कार्यक्षमता आणि दैनंदिन उत्पादकतेसाठी गॅलेक्सी एआय यांचे परिपूर्ण संयोजन आहे.
सॅमसंगने गॅलेक्सी टॅब्ससाठी प्रथमच गॅलेक्सी फॉरएव्हर (Galaxy Forever) प्रोग्राम सादर केला आहे, जो इन-बिल्ट अपग्रेड, सॅमसंग केअर+ अंतर्गत संरक्षण फायदे आणि ४० टक्के अशुअर्ड बायबॅकसह स्थिर ओनरशीप मॉडेल प्रदान करतो.
गुरुग्राम, भारत – ऑक्टोबर ७, २०२६: सॅमसंग इंडियाने आज गॅलॅक्सी टॅब एस१२ सिरीजच्या विक्रीची घोषणा केली, जी शक्तिशाली कार्यक्षमता आणि अल्ट्रा-थिन डिझाइनमध्ये आधुनिक गॅलॅक्सी एआयची सांगड घालणारा सॅमसंगचा आजपर्यंतचा सर्वात सक्षम आणि वैविध्यपूर्ण टॅबलेट अनुभव देते. हे नवीन टॅबलेट्स ग्रे आणि सिल्व्हर या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असतील.
गॅलॅक्सी टॅब एस१२ सिरीज खरेदी करणारे ग्राहक अनेक फायद्यांचा लाभ घेऊ शकतात, ज्यामध्ये मल्टि-बाय ऑफर्सचा समावेश आहे: गॅलॅक्सी झेड फोल्ड८, गॅलॅक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा किंवा एस२५+ यांसह टॅब आणि स्मार्टफोन खरेदीवर १५,००० रुपयांची सूट; निवडक वेअरेबल्सवर १५ टक्के सूट; प्रो कीबोर्ड कव्हरवर ३० टक्के सूट; ५,००० रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक; ५,००० रुपयांपर्यंत अपग्रेड बोनस; आणि सहभागी बँका तसेच एनबीएफसी भागीदारांमार्फत २४ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय सुविधा उपलब्ध आहे.
उत्पादकतेसाठी निर्मिती
गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्रा आणि टॅब एस१२+ मध्ये १६०० निट्सपर्यंत पीक ब्राईटनेससह विस्तृत डायनॅमिक एएमओएलईडी २X डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, या टॅब्जमधील व्हिजन बूस्टर वैशिष्ट्य कोणत्याही प्रकाशात सुस्पष्ट दृश्ये आणि व्युईंगचा सुलभ अनुभव देण्यासाठी ब्राईटनेस रिअल-टाइममध्ये समायोजित करते.
१४.६-इंच अल्ट्रा आणि १२.६-इंच प्लस मॉडेलसह, वापरकर्ते विनासायास मल्टीटास्किंगसाठी मल्टी विंडो लेआऊटद्वारे स्क्रीनचे तीन भागांमध्ये विभाजन करू शकतात. उदाहरणार्थ, वापरकर्ते एकाच वेळी लेक्चर स्ट्रीम करत असताना आणि एआय असिस्टंटचा वापर करत असताना सॅमसंग नोट्समध्ये नोट्स लिहू शकतात.
केवळ ५.१ मिमी स्लिम असलेला गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्रा हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम गॅलेक्सी टॅब आहे, तर गॅलेक्सी टॅब एस१२+ हे ५.३ मिमी स्लिम आहे. दोन्ही डिवाईसेसमध्ये ऊर्जा-कार्यक्षम ३ एनएम प्रोसेसर देण्यात आला आहे, जो आधीच्या मॉडेलच्या तुलनेत ६१ टक्के वेगवान एनपीयू प्रोसेसिंग, १९ टक्के वेगवान सीपीयू कार्यक्षमता आणि १७ टक्के सुधारित जीपीयू पॉवर प्रदान करतो. हे क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्सचे रेंडरिंग किंवा लेक्चर्ससोबत नोट्स घेण्यासारख्या मल्टीटास्किंगच्या आव्हानात्मक कामांसाठी सुरळीत कामगिरी सुनिश्चित करते.
दिवसभर चालणारी बॅटरी अल्ट्रा मॉडेलवर २३ तासांपर्यंत(2) आणि प्लस मॉडेलवर २१ तासांपर्यंत टिकते. तसेच ४५ वॅट अडॅप्टरचा वापर करून बॅटरी अवघ्या ९५ मिनिटांत ० टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत वेगाने चार्ज होते. नव्याने डिझाइन केलेले ३डी व्हेपर चेंबर दीर्घकाळ वापरादरम्यान विश्वासार्ह कार्यक्षमतेसाठी उष्णतेवर कार्यक्षमपणे नियंत्रण ठेवते.
टिकाऊपणासाठी डिझाइन करण्यात आलेली गॅलेक्सी टॅब एस१२ सिरीज पाणी आणि धूळ प्रतिबंधासाठी आयपी६८- प्रमाणित आहे, ज्यामुळे विविध वातावरणात लवचिकता व टिकाऊपणाची खात्री मिळते.
४-चॅनेल स्पॅटिअल ऑडिओद्वारे साऊंड दर्जा अधिक सुधारण्यात आला आहे, जो स्ट्रीमिंग, ट्युटोरियल्स किंवा एडिटिंग कामांसाठी समृद्ध आणि इमर्सिव्ह अनुभव देतो. अचूक इनपुटसाठी दोन्ही मॉडेल्ससोबत एर्गोनॉमिक एस पेन देण्यात आले आहे. प्रो कीबोर्ड कव्हरच्या मदतीने उत्पादकता अधिक वाढवता येऊ शकते, जे या टॅब्सचे व्यावसायिक वर्कस्टेशनमध्ये रूपांतर करते आणि एआय असिस्टंट्सचा तात्काळ वापर करण्यासाठी यात गॅलेक्सी एआय की देखील समाविष्ट आहे.
अॅप्ससह सुसज्ज
वन यूआय ९ सह अँड्रॉइड १७ वर चालणाऱ्या गॅलेक्सी टॅब एस१२ सिरीजमध्ये विनासायास टास्क व्यवस्थापनासाठी गॅलेक्सी एआय आहे. नोट असिस्ट रिअल टाइममध्ये नोट्सचा सारांश तयार करते, तर गुगल एआय प्रोची सहा महिन्यांची चाचणी तात्काळ शंका निरसन आणि विषयांच्या सखोल अभ्यासासाठी जेमिनायचा वापर उपलब्ध करून देते.
सॅमसंग ब्राउझर ओपन टॅब्सचा सारांश देऊन आणि संबंधित स्रोत समोर आणून संशोधनाची कार्यक्षमता वाढवतो. व्यावसायिक दर्जाच्या इमेज एडिटिंगसाठी अडोबी फोटोशॉप प्री-इन्स्टॉल केलेले आहे, गुडनोट्स एका वर्षाच्या मोफत वापरासह सुटसुटीत नोट-टेकिंग सुविधा देते, तर लुमाफ्युजन ६६ टक्के सवलतीत व्यावसायिक दर्जाचे व्हिडिओ एडिटिंग सक्षम करते. क्लिप स्टुडिओ पेंट डिजिटल कलेसाठी अचूक ड्रॉइंग टूल्स ६ महिन्यांच्या ट्रायलसह आणि पहिल्या सबस्क्रिप्शनवर २० टक्के सवलतीसह पुरवते, तसेच आर्कसाइट साध्या स्केचेसना अचूक सीएडी ड्रॉइंग्जमध्ये रूपांतरित करते. विशेष लाभांमध्ये चार महिन्यांचा मोफत फोटोशॉप मोबाइल प्लॅन आणि सबस्क्रिप्शनवरील सवलतींचा समावेश आहे.
गॅलेक्सी टॅब एस१२ सिरीज सात ओएस अपग्रेड्स आणि सिक्युरिटी अपडेट्सना सपोर्ट करते. सॅमसंग केअर+ नकळतपणे होणाऱ्या नुकसानासाठी दुरुस्ती आणि विस्तारित वॉरंटीसह सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करते.
प्रोटेक्टमॅक्स
निश्चिंत वापरासाठी, गॅलेक्सी टॅबचे मालक सॅमसंग केअर+ सर्व्हिस ‘प्रोटेक्टमॅक्स’ निवडू शकतात, ज्यामध्ये अमर्यादित क्लेम्स, जागतिक संरक्षण आणि निवडण्यासाठी अनेक प्लॅन्स (4) उपलब्ध आहेत:
नकळतपणे पडल्यामुळे आणि पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानाचे संरक्षण देणारा २ वर्षांसाठीचा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन
१ वर्षासाठीचा अॅक्सिडेंटल अँड लिक्विड डॅमेज प्लॅन
१ वर्षासाठीचा स्क्रीन प्रोटेक्शन प्लॅन
१ वर्षासाठीचा एक्सटेंडेड वॉरंटी प्लॅन
टीप: **निवडलेल्या प्लॅननुसार खर्च बदलू शकतो
गॅलेक्सी फॉरएव्हर
सॅमसंगने गॅलेक्सी टॅब्ससाठी पहिल्यांदाच गॅलेक्सी फॉरएव्हर प्रोग्राम सादर केला आहे, ज्यामुळे हे टॅब्स ग्राहकांसाठी अधिक सुलभ आणि परवडणारे ठरतील. हा उपक्रम सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि सॅमसंग डॉट कॉमवरून सॅमसंग फायनान्स+ द्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध असून १२,४९९ रुपये किमतीच्या गॅलेक्सी फॉरएव्हर पॅकसह स्थिर आणि विस्तारित मालकीचा पर्याय देतो.
या दोन वर्षांच्या प्रोग्रामांतर्गत ग्राहक डिवाईसच्या मूळ किमतीच्या ७५ टक्के रक्कम आणि गॅलेक्सी फॉरएव्हर प्रोग्राम फी २४ ईएमआयमध्ये विभागून भरून गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्रा आणि गॅलेक्सी टॅब एस१२+ स्वतःच्या मालकीचे करू शकतात. हा प्रोग्राम पात्र ग्राहकांना डिवाईसची मालकी आणि अपग्रेडसाठी निश्चित बाकी मूल्य लाभांसह सुव्यवस्थित पर्याय प्रदान करतो.
या सुविधेमुळे ग्राहक खालील बायबॅक मूल्यांच्या आधारे २४ महिन्यांच्या आत आपले डिवाईस परत करू शकतात किंवा अपग्रेड करू शकतात(3:
११ ते १३ महिने: ४० टक्के अशुअर्ड बायबॅक
१४ ते २४ महिने: २५ टक्के अशुअर्ड बायबॅक
गॅलेक्सी फॉरएव्हर प्रोग्राममध्ये सॅमसंग केअर+ चा देखील समावेश आहे, जो क्लेम प्रोसेसिंग फीशिवाय नकळतपणे पडल्यामुळे आणि पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून दोन वर्षांपर्यंत संरक्षण देतो. म्हणजेच ग्राहकांना सॅमसंग केअर+ स्वतंत्रपणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही, ते या पॅकेजचा भाग आहे.
उपलब्धता आणि किंमत
गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्राची सुरुवातीची किंमत १,४९,९९९ रुपये आहे, तर गॅलेक्सी टॅब एस१२+ ची सुरुवातीची किंमत १,२९,९९९ रुपये आहे. गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्रासाठी प्रो कीबोर्ड कव्हरची किंमत २७,९९९ रुपये आहे, तर गॅलेक्सी टॅब एस१२+ साठी प्रो कीबोर्ड कव्हरची किंमत २६,४९९ रुपये आहे.
दोन्ही मॉडेल्स – वाय-फाय आणि ५जी व्हेरिएंट्स, ज्यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी किंवा ५१२ जीबी स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत – ७ ऑक्टोबरपासून सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, पार्टनर स्टोअर्स, Samsung.com आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होतील.
टिप:
(1) ऑफर्स परस्पर अनन्य आहेत आणि एकत्रित केल्या जाऊ शकत नाहीत
(2) आदर्श लॅब चाचणी परिस्थितीनुसार
(3) अटी आणि शर्ती लागू
(4) निवडलेल्या प्लॅननुसार खर्च बदलू शकतात
फॅमिली
कनेक्टिव्हिटी
मेमरी/स्टोरेज
किंमत
गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्रा
वाय-फाय
१२ जीबी/२५६ जीबी
१,४९,९९९ रुपये
वाय-फाय
१२ जीबी/५१२ जीबी
१,६९,९९९ रुपये
५जी
१२ जीबी/२५६ जीबी
१,६४,९९९ रुपये
५जी
१२ जीबी/५१२ जीबी
१,८४,९९९ रुपये
गॅलेक्सी टॅब एस१२+
वाय-फाय
१२ जीबी/२५६ जीबी
१,२९,९९९ रुपये
वाय-फाय
१२ जीबी/५१२ जीबी
१,४९,९९९ रुपये
५
जी
१२ जीबी/२५६ जीबी
१,४४,९९९ रुपये
५जी
१२ जीबी/५१२ जीबी
१,६४,९९९ रुपये


