Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून फ्लॅगशिप-सारखी कॅमेरा नाविन्‍यता आणि सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट प्रोटेक्‍शन असलेले गॅलॅक्‍सी ए५५...

सॅमसंगकडून फ्लॅगशिप-सारखी कॅमेरा नाविन्‍यता आणि सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट प्रोटेक्‍शन असलेले गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी लाँच

गुरूग्राम, भारत – मार्च १४, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज सर्वोत्तम नाविन्‍यता असलेले गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली. नवीन ए सिरीज डिवाईसेसमध्‍ये अनेक फ्लॅगशिप-सारखी वैशिष्‍ट्ये आहेत, जसे गोरिला ग्‍लास विक्‍टस+ प्रोटेक्‍शन, एआयद्वारे सुधारण्‍यात आलेली कॅमेरा वैशिष्‍ट्ये आणि टेम्‍पर-रेसिस्‍टण्‍ट सिक्‍युरिटी सोल्‍यूशन सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट, तसेच इतर अनेक नवीन वैशिष्‍ट्ये आहेत.

फ्लॅगशिप सारखी डिझाइन आणि टिकाऊपणा

सॅमसंग गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्ये विविध डिझाइन इनोव्‍हेशन्‍स आहेत.

गॅलॅक्‍सी ए५५ ५जी: पहिल्‍यांदाच मेटल फ्रेमची भर करण्‍यात आली आहे.

गॅलॅक्‍सी ए३५ ५जी: पहिल्‍यांदाच प्रिमिअम ग्‍लास बॅकची भर करण्‍यात आली आहे.

या स्‍मार्टफोन्‍समध्‍ये फ्लॅगशिप-प्रेरित फ्लोटिंग कॅमेरा डिझाइनसह लायनर लेआऊट आहे. हे प्रिमिअम व शक्तिशाली स्‍मार्टफोन्‍स ऑसम लिलॅक, ऑसम आइसब्‍ल्‍यू आणि ऑसम नेव्‍ही या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहेत.

टिकाऊपणा या स्‍मार्टफोन्‍सची मुख्‍य ताकद आहे. हे डिवाईसेस आयपी६७ प्रमाणित आहेत, म्‍हणजेच ते १ मीटर फ्रेश वॉटरमध्‍ये जवळपास ३० मिनिटे टिकून राहू शकतात. तसेच, हे डिवाईसेस धूळ व वाळूला विरोध करण्‍यासाठी निर्माण करण्‍यात आले आहेत, ज्‍यामुळे कोणत्‍याही स्थितीसाठी अनुकूल आहेत. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी चे नकळतपणे पडल्‍यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षणासाठी पुढील व मागील बाजूस गोरिला ग्‍लास विक्‍टस+ संरक्षण आहे.

कॅमेरा वैशिष्‍ट्ये: एआयद्वारे सुधारित

या नवीन ए सिरीज स्‍मार्टफोन्‍समध्‍ये विविध नाविन्‍यपूर्ण एआय सुधारित कॅमेरा वैशिष्‍ट्ये आहेत, जे वापरकर्त्‍याच्‍या कन्‍टेन्‍ट गेमला नव्‍या उंचीवर नेतात. फोटो कॅप्‍चर केल्‍यानंतर एआय एडिट्सचा सल्‍ला देते, जसे फोटो रिमास्‍टर वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या फोटोंना अधिक आकर्षक करते, पोर्ट्रेट इफेक्‍ट महत्त्वपूर्ण असलेल्‍या गोष्‍टींवर फोकस करण्‍यास मदत करते आणि ऑब्‍जेक्‍ट इरेजर वैशिष्‍ट्य सर्व फोटो बॉम्‍बर्स व प्रतिबिंबांना दूर करण्‍यास वापरता येऊ शकते. अत्यंत लोकप्रिय इमेज क्लिपर कोणत्‍याही इमेजची क्लिप तयार करण्‍यास आणि त्‍याचा स्टिकर म्‍हणून वापर करण्‍यास मदत करते. अॅडजस्‍ट स्‍पीड वैशिष्‍ट्य देखील अद्भुत आहे, जेथे ते व्हिडिओजची गती बदलण्‍यास मदत करते आणि व्‍यावसायिकदृष्‍ट्या शूट केलेल्‍या क्लिप्‍सप्रमाणेच ड्रॅमॅटिक आऊटपुट्सची निर्मिती करते.

फक्‍त एवढेच नाही, सुधारित नाइटोग्राफीसह गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी अंधुक प्रकाशात देखील जवळपास ५० टक्‍के कमी आवाजासह अधिक सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटो कॅप्‍चर करतात. याचा अर्थ असा की, रात्रीच्‍या वेळी काढण्‍यात आलेला प्रत्‍येक फोटो आकर्षक असतो. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी चे प्रगत एआय इमेज सिग्‍नल प्रोसेसिंग (आयएसपी) आकर्षक लो-लाइट इमेजेसची निर्मिती करते, जे गॅलॅक्‍सी ए सिरीजमध्‍ये यापूर्वी कधीच दिसण्‍यात आलेले नाही. हे फक्‍त अद्भुत दिसणारे दृश्‍य नाही. एआय समर्थित पोर्ट्रेट मोड आणि सुपर एचडीआर व्हिडिओ प्रत्‍येक फ्रेम उत्तम असण्‍याची खात्री देतात, ज्‍यामुळे मित्र व कुटुंबियांसोबतच्‍या क्षणांना कॅप्‍चर करण्‍यासाठी परिपूर्ण प्रकाशावर अवलंबून राहावे लागत नाही.

गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी या दोन्‍ही स्‍मार्टफोन्‍समध्‍ये अविश्‍वसनीय फोटोग्राफी क्षमता आहेत, ज्‍यासाठी सॅमसंग गॅलॅक्‍सी ओळखले जाते. तसेच व्‍हीडीआयएसमुळे ४के स्‍टेबिलायझेशन + अॅडप्टिव्‍ह व्‍हीडीआयएस (व्हिडिओ डिजिटल इमेज स्‍टेबिलायझेशन) आणि ओआयएस (ऑप्टिकल इमेज स्‍टेबिलायझेशन) अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी चालता-फिरता देखील फोटो व व्हिडिओज सुस्‍पष्‍टपणे कॅप्‍चर होण्‍याची खात्री देतात.

गॅलॅक्‍सी ए५५ ५जी मध्‍ये ५० मेगापिक्‍सल मेनसह ओआयएस आणि १२ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड कॅमेरा आहे, तर गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्‍ये ५० मेगापिक्‍सल मेनसह ओआयएस आणि ८ मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड कॅमेरा आहे. दोन्‍ही स्‍मार्टफोन्‍समध्‍ये ५ मेगापिक्‍सल मॅक्रो आहे. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी मध्‍ये ३२ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा आहे, तर गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्‍ये १३ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा आहे.

मनोरंजनाला नेले नव्‍या उंचीवर

गॅलॅक्‍सी ए५५ आणि गॅलॅक्‍सी ए३५ वापरकर्त्‍यांच्‍या मनोरंजन अनुभवामध्‍ये अधिक वाढ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. दोन्‍ही डिवाईसेसच्‍या वैविध्‍यपूर्ण डिस्‍प्‍लेमध्‍ये वास्‍तविक रंगसंगतींसह ६.६ इंच एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले आणि किमान बेझल्‍स आहेत. १२० हर्टझ रिफ्रेश रेट गतीमध्‍ये देखील सहजपणे सीन-टू-सीन ट्रान्‍झशिन्‍सची खात्री देते. तसेच, अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट बॅटरीची कार्यक्षमता वाढवते, तर व्हिजन बूस्‍टर प्रखर सूर्यप्रकाशात देखील दृश्‍यमानता वाढवते. आय कम्‍फर्ट शील्‍ड देखील क्विक पॅनेलवर उपलब्‍ध आहे, ज्‍यामधून वापरकर्त्‍यांच्‍या डोळ्यांचे संरक्षण होते.

या स्‍मार्टफोन्‍सनी डॉल्‍बी-इंजीनिअर्ड स्टिरिओ स्‍पीकर्ससह साऊंड क्षमता देखील वाढवल्‍या आहेत, ज्‍यामधून प्रिमिअम ऑडिओ अनुभव मिळतो.

आतापर्यंतची सर्वोत्तम कार्यक्षमता

४ एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्‍यात आलेले नवीन एक्झिनॉस १४८० प्रोसेसर गॅलॅक्‍सी ए५५ ५जीला शक्‍ती देते, तर गॅलॅक्‍सी ए३५ ५जी ५ एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्‍यात आलेल्‍या एक्झिनॉस १३८० प्रोसेसरसह अपग्रेड करण्‍यात आला आहे. हे पॉवर-पॅक स्‍मार्टफोन्‍स विविध एनपीयू, जीपीयू व सीपीयू अपग्रेड्ससह ७० टक्‍क्‍यांहून अधिक मोठ्या कूलिंग चेम्‍बरसह येतात, ज्‍यामधून गेम असो किंवा मल्‍टी-टास्‍क असो सुलभ आऊटपुटची खात्री मिळते.

या सर्वोत्तम सुधारणांसह गॅलॅक्‍सी ए५५ ५जी मध्‍ये भर करण्‍यात आलेले १२ जीबी रॅम या डिवाईसला या किंमत विभागामधील गेम चेंजर बनवते. या डिवाईसेसमध्‍ये ५००० एमएएच क्षमतेच्‍या बॅटरीसह २५ वॅट चार्जिंग आहे आणि अँड्रॉईड १४ सह वन यूआय ६.१ आहे.

अभूतपूर्व सुरक्षितता

गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्‍ये पहिल्‍यांदाच फ्लॅगशिप गॅलॅक्‍सी डिवाईसेसपासून गॅलॅक्‍सी ए सिरीजच्‍या वापरकर्त्‍यांसाठी सॅमसंगचे सर्वात नाविन्‍यपूर्ण सुरक्षितता वैशिष्‍ट्य सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट आहे. हार्डवेअर आधारित सिक्‍युरिटी सिस्‍टम सुरक्षित अंमलबजावणी वातावरण निर्माण करत हार्डवेअर व सॉफ्टवेअर हल्‍ल्‍यांपासून सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करते, जे सिस्‍टमच्‍या मुख्‍य प्रोसेसर व मेमरीपासून प्रत्‍यक्ष वेगळे आहे. यामुळे डिवाईसमधील सर्वात महत्त्वपूर्ण डेटासह लॉक स्क्रिन क्रेडेन्शियल्‍स जसे पिन कोड्स, पासवर्डस् आणि पॅटर्न्‍सचे संरक्षण होते. सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट डिवाईस एन्क्रिप्‍शन कीजचे देखील संरक्षण करते, ज्‍यामुळे डिवाईसवर स्‍टोअर करण्‍यात आलेल्‍या वापरकर्त्‍यांच्‍या खाजगी डेटाचे एन्क्रिप्ट होते. योग्‍य लॉक स्क्रिन क्रे‍डेन्शियल्‍स असलेले वापरकर्ते डिवाईस हरवला किंवा चोरी झाला तरी त्‍यांचा डेटा मिळवू शकतात.

अधिक सुरक्षिततेसाठी गॅलॅक्‍सी ए सिरीज मध्‍ये ऑटो ब्‍लॉकर आहे, जे कार्यान्वित केल्‍यास अनऑथोराइज्‍ड स्रोतांकडून अॅप इन्‍स्‍टॉलेशन्‍सना ब्‍लॉक करू शकते, संभाव्‍य मालवेअर ओळखण्‍यासाठी अॅप सुरक्षितता तपासते आणि यूएसबी केबलशी कनेक्‍टेड असताना डिवाईसमधील संभाव्‍य मालिशियस कमांड्स व सॉफ्टवेअर इन्‍स्‍टॉलेशन्‍सना ब्‍लॉक करते. वापरकर्ते प्रायव्‍हेट शेअरिंगचा देखील आनंद घेऊ शकतात, जे महत्त्वपूर्ण वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती असलेल्‍या खाजगी फाइल्‍सचे सुरक्षित व एन्क्रिप्‍टेड शेअरिंग देते. वापरकर्त्‍यांना सिक्‍युअर फोल्‍डर वैशिष्‍ट्य देखील मिळू शकते, ज्‍याद्वारे ते त्‍यांच्‍या डिवाईसेसवर पूर्णत: एन्क्रिप्‍टेड स्‍पेस निर्माण करू शकतात, जे ते त्‍यांच्‍या फिंगरप्रिंट किंवा पासवर्डमधून प्राप्‍त करू शकतात.

सर्वोत्तम अनुभव

गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी ग्राहकांना सॅमसंग वॉलेट मिळेल, जे मोबाइल वॉलेट सोल्‍यूशन आहे आणि तुम्‍हाला गॅलॅक्‍सी डिवाईसमध्‍ये महत्त्वाच्‍या गोष्‍टी सोईस्‍करपणे व सुरक्षितपणे वाहून नेण्‍यास मदत करते. यामध्‍ये तुमचे पेमेंट कार्डस्, डिजिटल आयडी, प्रवास तिकिटे अशा बाबींची भर करा. तसेच, सॅमसंग वॉलेट लिमिटेड टाइम ऑफर देत आहे, ज्‍याअंतर्गत पहिला यशस्‍वी टॅप अँड पे व्‍यवहार करणाऱ्या प्रत्‍येक ग्राहकाला २५० रूपयांचे अॅमेझॉन वाऊचर मिळेल.

या डिवाईसेसमध्‍ये अत्‍यंत लोकप्रिय वॉईस फोकस वैशिष्‍ट्य आहे, जे वापरकर्त्‍यांना मोठ्या आवाजाबाबत चिंता न करता कॉल्‍स करण्‍याची व रिसिव्‍ह करण्‍याची सुविधा देते.

नवीन गॅलॅक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन्‍समधून सॅमसंगची गॅलॅक्‍सी डिवाईसेस दीर्घकाळापर्यंत सुरक्षित व अद्ययावत राहण्‍याची खात्री घेण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी सह वापरकर्त्‍यांना अँड्रॉईड ओएसचे जवळपास चार जनरेशन्‍स आणि पाच वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्सचे फायदे मिळतील, ज्‍यामुळे त्‍यांना नवीन गॅलॅक्‍सी आणि अँड्रॉईड वैशिष्‍ट्यांसह सुसज्‍ज करत डिवाईसेसच्‍या जीवनचक्र ऑप्टिमाइज होईल.

गॅलॅक्‍सी फॉर द प्‍लॅनेट

गॅलॅक्‍सी ए५५ आणि गॅलॅक्‍सी ए३५ भावी पिढीला लक्षात घेत डिझाइन व निर्माण करण्‍यात आले आहेत. या डिवाईसेसच्‍या निर्मितीमध्‍ये रिसायकल केलेले पेपर व प्‍लास्टिक वापरण्‍यात आले. ते घातक पदार्थांपासून मुक्‍त देखील आहेत.

Memory Variants, Price, Availability and Offers
Product

Storage Variant

Price*

Galaxy A55 5G

8GB+128GB

INR 36999

8GB+256GB

INR 39999

12GB+256GB

INR 42999

Galaxy A35 5G

8GB+128GB

INR 27999

8GB+256GB

INR 30999

*सर्व किमतींमध्‍ये एचडीएफसी, वनकार्ड, आयडीएफसी फर्स्‍ट बँक कार्ड्सवरील ३००० रूपयांच्‍या बँक कॅशबॅकसह ६ महिन्‍यांच्‍या नो कॉस्‍ट ईएमआय ऑप्‍शन्‍सचा समोवश आहे. तसेच, ग्राहक सॅमसंग फायनान्‍स+ आणि सर्व आघाडीच्‍या एनबीएफसी सहयोगींच्‍या माध्‍यमातून प्रतिमहिना १७९२ रूपयांच्‍या ईएमआयसह गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि प्रतिमहिना १७२३ रूपयांच्‍या ईएमआयसह गॅलॅक्‍सी ए३५ खरेदी करू शकतात.

इतर ऑफर्स

· सॅमसंग वॉलेट: पहिल्‍या यशस्वी टॅप अँड पे व्‍यवहारावर २५० रूपयांचे अॅमेझॉन वाऊचर मिळवा.

· यूट्यूब प्रीमियम: २ महिने मोफत (१ एप्रिल २०२५ पर्यंत)

· मायक्रोसॉफ्ट ३६५: मायक्रोसॉफ्ट ३६५ बेसिक + ६ महिन्‍यांचे क्‍लाऊड स्‍टोरेज (जवळपास १०० जीबीपर्यंत, ऑफर रिडम्‍प्‍शन ३० जून २०२४ पर्यंत करता येऊ शकते)

उपलब्‍धता

दोन्‍ही डिवाईसेस खरेदीसाठी १४ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून Samsung.com वरील लाइव्‍ह कॉमर्सच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध असतील, तसेच १८ मार्च २०२४ पासून सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह व पार्टनर स्‍टोअर्स आणि इतर ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments