Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedफ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. ११ मधील जॉगर्स पार्क परिसरातील अनधिकृत...

फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. ११ मधील जॉगर्स पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामावर निष्कासन कारवाई सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त

पिंपरी, दि. २० मे २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. ११ येथील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत सुमारे १५०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. शहरातील सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवणे आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवणे या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान उप आयुक्त अतुल पाटील, प्रशासन अधिकारी महादेव बोरे, बांधकाम परवानगी विभागाचे उप अभियंता किरण सगर व कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे, तसेच उद्यान स्थापत्य व क्रीडा विभागाचे कनिष्ठ अभियंता वैभव विटकरे उपस्थित होते. याशिवाय बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) साक्षी जांभुळकर, निकिता भोईटे, विकास वारभुवन आणि रूपक शिनगारे यांनीही कारवाईत सक्रिय सहभाग नोंदविला.

 

सदर कारवाईसाठी फ, अ आणि क क्षेत्रीय कार्यालयांमधील एकूण ५७ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसेच १७ अतिक्रमण पोलीस, ६ जेसीबी मशीन, ८ मजूर आणि ३ वाहन चालक यांच्या सहाय्याने ही कारवाई प्रभावीपणे पार पाडण्यात आली.

 

 

 

कोट

 

शहरातील सार्वजनिक जागा, उद्याने आणि नागरिकांसाठी राखीव असलेली मोकळी मैदाने अतिक्रमणमुक्त ठेवणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसह शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी अशा कारवाया यापुढेही सातत्याने आणि अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील.

 

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड म

हानगरपालिका

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments