Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedआळंदी रोड कार्यालयात हलक्या मोटार वाहनांच्या पुनर्चाचणी व अनुज्ञप्ती नूतनीकरणाचे कामकाज २५...

आळंदी रोड कार्यालयात हलक्या मोटार वाहनांच्या पुनर्चाचणी व अनुज्ञप्ती नूतनीकरणाचे कामकाज २५ मेपासून पूर्ववत सुरू* 

 

पुणे, दि. २२ मे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या आळंदी रोड कार्यालय परिसरात स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्ग (एडीटीटी) चे कामकाज सुरू असल्याने जागेच्या उपलब्धतेअभावी हलक्या मोटार वाहन संवर्गातील अनुज्ञप्ती नूतनीकरणासंदर्भातील पुनर्चाचणी व नूतनीकरणाचे कामकाज आयडीटीआर येथे करण्यात येत होते.

मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी हलक्या मोटार वाहन संवर्गातील पुनर्चाचणी व अनुज्ञप्ती नूतनीकरणाचे कामकाज दि. २५ मे २०२६ पासून पूर्वीप्रमाणे आळंदी रोड कार्यालय येथे पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी दिली आहे.

नागरिकांनी याची नोंद घ्यावी तसेच अनुज्ञप्ती नूतनीकरणाची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments