Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedभगवंत पाहतो या विश्वासातूनच आत्मनियंत्रण निर्माण होते* प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद...

भगवंत पाहतो या विश्वासातूनच आत्मनियंत्रण निर्माण होते* प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’वर प्रवचनमालेचा सहावा दिवस

 

 

पुणे : मोरयाला असंख्य नेत्र आहेत. ज्याला असंख्य नेत्र असतात त्याला सगळे कळते. मग खोलीत कोणी असो की नसो, सीसीटीव्ही असो की नसो, मी व्यवस्थित वागतो; कारण माझा मोरया पाहतोय याच्यावर विश्वास असायला हवा. जोपर्यंत ‘भगवान पाहतो’ याच्यावर विश्वास होता, तोपर्यंत सीसीटीव्हीची गरज नव्हती. आता ती आली; कारण तो विश्वास उडाला आणि त्याला बुद्धिवादाची उपमा देण्यात आली. स्वर्ग असो की नरक, पाप असो की पुण्य यापेक्षा हे आत्मनियंत्रणाचे शास्त्र आहे, असे प्रतिपादन प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी केले.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत यवतमाळ-वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी श्री गणेश गीतेतील भक्तीयोगावर सहाव्या दिवशी निरूपण केले. श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात ही प्रवचनमाला सुरू आहे. अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर भगवान श्री गणेशांच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा श्री गणेश गीतेतील भक्तीयोग गणेशभक्तांसमोर मांडण्यासाठी प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज म्हणाले, ‘भगवंताला असंख्य नेत्र आहेत. मोरयाच्या हातात कोटी सूर्यांप्रमाणे तेजस्वी आयुधं आहेत. प्रत्येक आयुधाला वेगळी छटा आहे. मोरयाच्या हातात फक्त शस्त्र नाहीत, तर अर्थपूर्ण आयुधं आहेत. शस्त्र विनाशासाठी असतात, तर आयुध ही निर्मितीसाठी असतात.’

 

ते पुढे म्हणाले, ‘भगवंताचे वैभव समजून घेतले पाहिजे. जगातील प्रत्येक जीव वेगळा आहे ; मात्र मोरयाचे वैशिष्ट्य असे आहे की, तो पारंपरिक सौंदर्याच्या नियमांत बसत नाही. इतर देवतांना विशिष्ट रूपांच्या मर्यादा असतात. परंतु मोरयाला कोणतेही निश्चित रूप नसल्यामुळे तो प्रत्येक रूपात अनुभवता येतो. याच कारणामुळे मोरयाचे वैभव इतर देवतांपेक्षा वेगळे आणि व्यापक ठरते.’

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments