पुणे, २६ मे २०२६ : क्रिकेटचा सर्वांत मोठा हंगाम अंतिम सामन्यापर्यंत पोहोचत असताना सोशल ने मॅच डे डेस्टीनेशनचा अनुभव देण्यासाठी दुसरास्टेडियम उपक्रम ग्राहकांसाठी पुन्हा आणला आहे. याअंतर्गत भारतभरातील विविध आउटलेट्स मध्ये चाहते मोठ्या स्क्रीनवर फायनलचा थरार अनुभवू शकतील. क्रिकेट-थीम डेकोर, जल्लोषमय वातावरण, सामन्याचा रोमांच आणि प्रत्येक चौकार, विकेट व शेवटच्या षटकातील थरार अधिक भव्य बनवणारा सामूहिक उत्साह यामुळे हा अनुभव अविस्मरणीय ठरणार आहे.याचबरोबर देशभरातील प्रसिद्ध प्रादेशिक चवींपासून प्रेरित खास मॅच-डे मेनूसह चाहत्यांसाठी अधिक रंगतदार अनुभव घेऊन आले आहे.या मेनूमध्ये अनेक लोकप्रिय पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राजस्थान बॅलेस्टिक भजियाज्,हैदराबाद ओजी हलिम बिर्याणी,लखनौ भारवान गलौटी,बंगळुरू ओजी स्टेडियम सामोसा,पंजाब सिक्सर छोले भटोरे,गुजरात फरसाण प्लॅटर,मुंबई वडा प्लॅटर,दिल्ली मॅच मोमोज्,कोलकाता फिले-ओ-फिश बर्गर यासारख्या चविष्ट पदार्थांचा समावेश आहे.दुसरा स्टेडियम 2026 अनुभव हा पुणे,मुंबई,दिल्ली-एनसीआर,बंगळुरू,हैदराबाद,कोलकाता,लखनौ,चंदीगड आणि देहरादून मधील सोशल आऊटलेटसमध्ये मिळणार आहे.


