Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedरांजणगाव एमआयडीसी येथे २९ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन;...

रांजणगाव एमआयडीसी येथे २९ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६५ रिक्त पदांसाठी संधी*

 

पुणे, दि. 26 (जिमाका, वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि एज्युस्पार्क इंटरनॅशनल प्रा. लि., एमआयडीसी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी रांजणगाव एमआयडीसी, ता. शिरूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमार्फत एकूण ५६५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in⁠ संकेतस्थळावर भेट देऊन संबंधित रिक्त पदांसाठी अर्ज करावा. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती व किमान ५ रेझ्युमे प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क साधावा.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments