Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorized*२८ मे च्या शासकीय सुट्टीमुळे पुणे आरटीओतील पूर्वनियोजित अपॉइंटमेंटधारकांसाठी विशेष व्यवस्था*

*२८ मे च्या शासकीय सुट्टीमुळे पुणे आरटीओतील पूर्वनियोजित अपॉइंटमेंटधारकांसाठी विशेष व्यवस्था*

 

पुणे, दि. 26 (जिमाका, वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाने २८ मे रोजी बकरी इद निमित्त शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे अंतर्गत अनुज्ञप्ती कामकाजासंदर्भात पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या अर्जदारांसाठी विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

 

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (आयडीटीआर, आळंदी रोड व संगमब्रिज कार्यालय) येथे २८ मे रोजी सारथी प्रणालीवर अनुज्ञप्ती कामकाजासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी शक्य असल्यास २७ मे रोजी संबंधित कार्यालयात उपस्थित राहून आपले कामकाज पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

तसेच ज्या अर्जदारांना २७ मे रोजी उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यांनी २७ मे ते ०३ जून २०२६ या कालावधीत कोणत्याही कार्यालयीन दिवशी संबंधित कार्यालयात उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत. २८ मे २०२६ रोजीची पूर्वनियोजित अपॉइंटमेंट संबंधित अर्जदारांसाठी ग्राह्य धरली जाणार असून, नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments