Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedआर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया ठरली एपीआय 5एल एक्स 100 समतुल्य सर्वाधिक मजबुतीच्या...

आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया ठरली एपीआय 5एल एक्स 100 समतुल्य सर्वाधिक मजबुतीच्या वेल्डेड पाइप्सचे उत्पादन करणारी जगातील पहिली स्टील कंपनी

अमेरिकन ब्युरो ऑफ शिपिंग ( एबीएस) कडून प्रमाणित मान्यता प्राप्त; ऑफशोअर वापरासाठी आवश्यक कडक आंतरराष्ट्रीय मानकांसह मजबुतीच्या निकषांची पूर्तता सिद्ध

उच्च कार्यक्षमतेच्या आणि महत्त्वपूर्ण स्टील अनुप्रयोगांमध्ये जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमतेचे कंपनीने प्रदर्शन केले

स्वदेशी उत्पादनाला चालना देत आणि आयात कमी करण्यास मदत करत ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळकटी

 

 

दिल्ली / हजीरा, 28 मे 2026 : आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएम/एनएस इंडिया) ने जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमतेचे प्रदर्शन करत समुद्री अभियांत्रिकी प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वाधिक मजबुतीच्या वेल्डेड पाइप्स (ईक्यू 70 ग्रेड) चे उत्पादन करणारी जगातील पहिली स्टील कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे. या पाइप्सना अमेरिकन ब्युरो ऑफ शिपिंग ( एबीएस) कडून प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. एबीएस ही अग्रगण्य सागरी वर्गीकरण संस्था असून ती मजबुतीच्या निकषांसह जागतिक मान्यताप्राप्त मानकांचे पालन होत असल्याची स्वतंत्र पडताळणी करते.

 

 

 

ऑफशोअर अभियांत्रिकी क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित करत आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडियाच्या या उपक्रमामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ अभियानांना मोठे बळ मिळत आहे. या माध्यमातून देशातच सर्वाधिक मजबुतीचे वेल्डेड पाइप्स उपलब्ध होणार असून, सध्या तेल व वायू प्लॅटफॉर्म, ऑफशोअर विंड स्ट्रक्चर्स आणि खोल समुद्रातील पाइपलाइनसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी युरोपमधून आयात केल्या जाणाऱ्या सीमलेस पाइप्सना पर्याय निर्माण होणार आहे. उच्च कार्यक्षमतेच्या या वेल्डेड पाइप्समुळे भारतातील ऑफशोअर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील ग्राहकांना पुरवठ्याची अधिक सुरक्षितता, कमी कालावधीत उपलब्धता आणि कमी खर्चाचा फायदा होणार असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होणार आहे.

 

 

 

कंपनीच्या या नव्या प्रगतीमुळे स्टील उत्पादनातील नवोन्मेषासाठीची तिची बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. यासाठी तिच्या मूळ कंपन्या आर्सेलरमित्तल आणि निप्पॉन स्टील यांचे मजबूत तांत्रिक कौशल्य, संशोधन-विकास क्षमता आणि जागतिक दर्जाच्या कार्यपद्धतींचा आधार लाभला आहे. ‘स्मार्टर स्टील्स, ब्राइटर फ्युचर्स’ या ब्रँड वचनाशी सुसंगत असलेला हा टप्पा आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडियाची सक्षम आणि आत्मनिर्भर देशांतर्गत स्टील परिसंस्था उभारण्यात तसेच अत्यंत विशेष आणि कडक नियमन असलेल्या जागतिक अनुप्रयोगांच्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो.

 

 

 

आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडियाने देशातील आघाडीच्या तेल आणि वायू उत्पादक कंपनीला मोठ्या प्रमाणात वेल्डेड पाइप्सचा पुरवठा आधीच केला आहे.

 

 

 

अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट ( एपीआय) 5एल एक्स 100क्यू समतुल्य असलेला ईक्यू 70 ग्रेड हा उच्च मजबुतीचा आणि कमी मिश्रधातू असलेला स्टील ग्रेड असून, त्याची किमान यिल्ड स्ट्रेंथ 690 मेगापास्कल (एमपीए) आहे. तसेच त्यामध्ये उत्कृष्ट मजबुती आणि टिकाऊपणा आहे. ईक्यू 70 ग्रेडचे वेल्डेड पाइप्स ऑफशोअर क्षेत्रातील जॅक-अप रिग्समधील लेग ब्रेसींग आणि खोल समुद्रातील पाइपलाइनसारख्या कठीण वापराच्या गरजा पूर्ण करतात. त्यांच्या उच्च मजबुतीमुळे संरचनेची सुरक्षितता अबाधित ठेवत अधिक पातळ आणि हलक्या पाइप्सचा वापर शक्य होतो. तसेच प्रगत वेल्डिंग क्षमता आणि गंजरोधक गुणधर्मांमुळे कठीण सागरी वातावरणातही त्यांची विश्वासार्हता कायम राहते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गुजरातमधील हजीरा येथील कंपनीच्या प्रमुख प्रकल्पात सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग (एसएडब्ल्यू) तंत्रज्ञानाचा वापर करून एबीएस ईक्यू 70 ग्रेड प्लेट्सपासून वेल्डेड पाइप्सची यशस्वी निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे महत्त्वाच्या ऑफशोअर प्रकल्पांसाठी सुरक्षितता, शाश्वतता आणि किफायतशीर उत्पादनाच्या दृष्टीने उद्योगात नवे मानदंड प्रस्थापित झाले आहेत. अत्युच्च मजबुतीचे वेल्डेड पाइप्स तयार करणे हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानले जाते, कारण त्यासाठी बेस मेटल आणि वेल्डेड सीम या दोन्ही भागांमध्ये समान मजबुती आणि टिकाऊपणा राखणे आवश्यक असते. तसेच कठीण ऑफशोअर परिस्थितीतही संरचनेची सुरक्षितता सुनिश्चित करावी लागते. या नवकल्पनेमुळे भारताच्या उत्पादन क्षमतेला अधिक उच्च मूल्यसाखळीकडे नेण्यास मदत झाली आहे.

 

 

 

एबीएस प्रमाणपत्रामुळे या वेल्डेड पाइप्सनी सुरक्षितता, मजबुती, संरचनात्मक स्थिरता आणि सागरी वातावरणातील कार्यक्षमतेसाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त निकष पूर्ण केल्याची स्वतंत्र पुष्टी मिळाली आहे. हे प्रमाणपत्र ऑफशोअर आणि सागरी प्रकल्पांमध्ये सहभागासाठी अत्यंत महत्त्वाची अट मानली जाते. त्यामुळे या उत्पादनाचा नियमनबद्ध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये वा

पर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments