Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून मे २०२६ अखेर ८८ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त.. ...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून मे २०२६ अखेर ८८ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त.. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान समारंभ उत्साहात संपन्न…

पिंपरी, दि. २९ मे २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेतून दिलेले योगदान संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे, अशा शब्दांत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच यापुढे सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचा-यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवानिवृत्ती वेतन आदेश व देय रकमेचा लाभ देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना केल्या.

 

 

 

 

 

महानगरपालिकेच्या वतीने संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान समारंभात मे २०२६ अखेर नियत वयोमानानुसार ७२ तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या १६ अशा एकूण ८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

 

 

 

 

 

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त तानाजी नरळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजर्डे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या कार्यकाळात जबाबदारीची जाणीव ठेवून उत्कृष्ट सेवा बजावली आहे. सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा आयुष्यातील नवीन पर्व असतो. या काळात समाजकार्यात सक्रिय सहभाग घेत आनंदी, समाधानकारक आणि आरोग्यपूर्ण जीवन जगावे. तसेच कुटुंबीयांनीही त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्या योगदानाचा आदर करावा.

 

 

 

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, सेवानिवृत्ती ही केवळ शासकीय प्रक्रियेपुरती मर्यादित असते, मनातील सेवाभाव कधीही निवृत्त होत नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजवर जपलेली लोकसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि अनुभव याचा लाभ पुढील पिढीला मिळावा. शहराच्या विकास प्रक्रियेत मार्गदर्शक म्हणून त्यांनी पुढेही योगदान द्यावे.

 

 

 

मे २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये सह शहर अभियंता माणिक चव्हाण, कार्यकारी अभियंता रविंद्र सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त राजीव घुले, राजाराम सरगर,

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments