Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedदगडूशेठ' गणपती ट्रस्टच्या 'श्रीमंत' कॉफी टेबल बुकचे प्रकाशन*  ज्येष्ठ अभिनेते मोहन...

दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या ‘श्रीमंत’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन*  ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची उपस्थिती ; सामाजिक, धार्मिक, आरोग्य क्षेत्रातील कार्याचा विस्तृत आढावा

 

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या ‘श्रीमंत’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन नुकतेच मंदिरात झाले. ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक, आरोग्य क्षेत्रातील कार्याचा विस्तृत आढावा यामध्ये घेण्यात आला असून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला.

 

या ग्रंथपुष्पाचे प्रायोजकत्व वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्या तर्फे करण्यात आले आहे. यावेळी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे भागीदार आशिष पेठे, गौरी पेठे, आदिवेद अॅडव्हर्टायजिंग सर्जनशील संचालक व लेखक मिलिंद घैसास, कला संचालक स्वाती घैसास, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, प्रतीक घोडके यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आदिवेद अॅडव्हर्टायजिंग ने देखील या कार्यात विशेष सहभाग घेतला.

 

मोहन जोशी म्हणाले, आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील कायम लक्षात राहणारा दिवस असेल. मंदिरात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटले. श्रीमंती ही क्षणिक नसून ती शाश्वत आहे. सेवा, साधना आणि सदभावनेतून ती साकारलेली आहे. ट्रस्टचे सुरु असलेले सर्वच क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असून त्यासाठी माझ्या शुभेच्छा.

 

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, आजपर्यंतची मंदिराची वाटचाल आणि ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे जे जे कार्य घडले, ते या कॉफी टेबल बुकमध्ये आहे. मंदिराचा जो प्रवास आहे, तो एक गणपती मंडळ ते तीर्थक्षेत्र असा प्रवास यातून उलगडून दाखविण्यात आला आहे. ट्रस्टने पारदर्शकतेच्या आधारे समाजाच्या तळागाळातील प्रत्येक घटकाचा विश्वास संपादन केला असून त्याच विश्वासाच्या भक्कम पायावर ही समाजकार्याची श्रीमंती उभी असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments