पुणे , दिनांक ८ जून
निगडी येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर अरविंद तेलंग महाविद्यालयातील संगणक शास्त्राच्या प्राध्यापिका अनुराधा माधव संगवई यांना छत्रपती संभाजी नगर येथील एमजीएम विद्यापीठातर्फे नुकतीच डॉक्टरेट ची पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. अनुराधा माधव संगवई यांनी ” मिटीगेशन अँड मॅपिंग ऑफ फ्लड इन द रिवर बेसिन ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र युजिंग जी आय एस अँड रिमोट सेन्सिंग ” या विषयावर आपला शोध प्रबंध सादर केला होता.
प्रा. डॉ. अजय नागणे यांनी त्यांना गाईड म्हणून मार्गदर्शन केले.
प्रा. अनुराधा माधव संगवई यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, कुलसचिव डॉक्टर आशिष गाडेकर, मुख्य परीक्षा नियंत्रक डॉक्टर एच. एच. शिंदे,
प्राचार्या डॉक्टर प्राप्ती देशमुख व सर्व संबंधित प्राध्यापक व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


