Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, येरवडा येथे प्रवेश प्रक्रिया...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, येरवडा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू*

 

पुणे, दि. 8 (जिमाका, वृत्तसेवा): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, येरवडा (जुने), पुणे-०६ येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज hmas.mahait.org⁠ या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात मोफत प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रक्रिया प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार राबविण्यात येणार आहे.

वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, भोजन, बेडिंग साहित्य, पुस्तके, स्टेशनरी, गणवेश, शैक्षणिक सहलीसाठी आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसतिगृह प्रशासनाने केले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments