Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवडच्या दिशेने महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार महापालिकेच्या...

स्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवडच्या दिशेने महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत लोकसहभागातून स्वच्छता मोहिमांना गती देण्याचे निर्देश

पिंपरी, दि. ०९.०६.२०२६ : शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने “स्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवड” ही संकल्पना मा. महापौर रवि लांडगे यांनी मांडली असून, या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाबरोबरच शहर स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार आहे. याच अनुषंगाने महापौर रवि लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून लोकसहभागावर आधारित स्वच्छता मोहिमा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत त्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर केलेले आहे.

 

 

 

शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

 

 

याअंतर्गत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत “स्वच्छ रस्ता – स्वच्छ परिसर” स्पर्धा, दर आठवड्याला विशेष स्वच्छता अभियान, शाळा-महाविद्यालयांमध्ये “स्वच्छता दूत” उपक्रम, अस्वच्छ ठिकाणी वॉल आर्टद्वारे सौंदर्यीकरण, तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या तातडीच्या निवारणासाठी डिजिटल प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

 

 

 

तसेच मोठ्या उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये “झिरो गार्बेज इव्हेंट” संकल्पना राबविणे, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था व CSR च्या माध्यमातून “Adopt a Spot” उपक्रम सुरू करणे आणि प्रत्येक स्वच्छता कामाचे “Before-After” स्वरूपात दस्तऐवजीकरण करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 

 

महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले की, “स्वच्छ आणि हरित पिंपरी-चिंचवड ही केवळ मोहीम नसून शहराच्या भविष्यासाठीचा जनआंदोलनात्मक उपक्रम आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून आपण स्वच्छ, हरित आणि आदर्श शहर घडवू.”

 

 

 

या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी स्वतंत्र कृती आराखडा तयार करून नियमित प्रगती अहवाल सादर करण्याच्या सूचनाही प्रशासनाला

देण्यात आल्या आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments